नकाशातील हिरवी रेषा मॉन्सूनची परतीची सिमा दर्शविते
नकाशातील हिरवी रेषा मॉन्सूनची परतीची सिमा दर्शविते  
मुख्य बातम्या

यंदा मॉन्सूनने राज्याला लवकरच अलविदा केले...

टीम अॅग्रोवन

पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. शनिवारी (ता. ६) संपूर्ण राज्यातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनच्या परतीचा प्रवासाला वेग आला आहे. ता. २९ सप्टेंबर रोजी राजस्थानमधून परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर आठ दिवसांत देशाच्या बहुतांशी भागातून वारे परतले. सोमवारपर्यंत (ता. ८) मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.   यंदाच्या हंगामात ८ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने २३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर जवळपास चार महिने मॉन्सूनचे राज्यात अस्तित्व होते.  शुक्रवारी (ता. ५) निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर शनिवारी (ता. ६) संपूर्ण राज्यातून मॉन्सून परतला अाहे. गेल्या आठ वर्षांची वाटचाला पाहता यंदा मॉन्सूनने राज्याला लवकरच अलविदा केला आहे. गेल्या वर्षी (२०१७) आणि २०११ मध्ये २४ अॉक्टोबर रोजी, २०१३ मध्ये २१ ऑक्टोबर, २०१२ व २०१५ मध्ये १५ ऑक्टोबर, २०१४ मध्ये १८ ऑक्टोबर तर २०१६ मध्ये १६ आॅक्टोबर रोजी मॉन्सून महाराष्ट्रातून परतला हाेता.   अरबी समुद्रात तयार होत असलेल्या ‘चक्रीवादळामुळे माॅन्सूनची परतीचा वेग वाढला आहे. शनिवारी मॉन्सूनने छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणाच्या संपूर्ण भाग, अांध्र प्रदेशचा किनारपट्टीय भाग, रायलसीमा आणि कमर्नाटच्या आणखी काही भागांतून माघार घेतली. सोमवारी (ता. ८) दक्षिण भारतातील राज्यांसह संपूर्ण देशातून मॉन्सून परतणार असून, या भागात ईशान्य माेसमी वाऱ्यांपासून (ईशान्य मॉन्सून) पाऊस सुरू होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  चक्रीवादळाचे संकेत अरबी समुद्रात लक्षद्वीप आणि मालदीव बेटांच्या परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत असून, शनिवारी त्याचे ठळक कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले. अोमानच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकणारी ही प्रणाली आणखी तीव्र होत असून, उद्या (ता. ८) सकाळपर्यंत ‘चक्रीवादळ’ तयार होण्याचे संकेत आहे. मध्य अरबी समुद्रात ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणार शक्यता आहे. त्यामुळे समुद्र खवळून उचं लाटा उसळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातही सोमवापर्यंत (ता. ८) आणखी एक कमी दाबक्षेत्र तयार होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT