monsoon
monsoon  
मुख्य बातम्या

रविवारपर्यंत मॉन्सूनची आणखी चाल शक्य 

टीम अॅग्रोवन

पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी (ता.४) पश्चिम किनारपट्टीवर वाटचाल करत, संपूर्ण केरळ व्यापला आहे. तर कर्नाटक राज्याची संपूर्ण किनारपट्टीव्यापत कारवार, हसनपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मॉन्सून वारे जवळपास गोव्याच्या उंबरठ्यावर पोचले आहे. रविवारपर्यंत (ता.७) कर्नाटक, तामिळनाडूच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  यंदा मॉन्सून चार दिवस उशीराने केरळात येण्याची शक्यता असताना, अरबी समुद्रात असलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मॉन्सून नियमित वेळवर १ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. देशाच्या मुख्य भुमीवर आगमन होतात मॉन्सूनने सोमवारी (ता.१) केरळच्या कन्नूर, तामिळनाडूच्या कोईंबतूर, कन्याकुमारीपर्यंतचा भाग व्यापला होता. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत जाताना पश्‍चिम किनारपट्टीलगत मॉन्सूनची आणखी वाटचाल केली आहे. गुरुवारी (ता.४) केरळ, कोमोरीनचा सर्व भाग, श्रीलंका व दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, कर्नाटकसह आणि मध्य अरबी समुद्राच्या काही भागात मॉन्सून दाखल झाले. शुक्रवारी (ता.५) वाऱ्यांनी आणखी प्रगती केली नाही.  ‘निसर्ग’मुळे मॉन्सून वाऱ्यांवर प्रभाव पडला आहे. पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती केली असली तरी अंतर्गत भागात मात्र मॉन्सून दाखल झालेला नाही. शुक्रवारी मध्य प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होते. वादळ जमिनीवर येऊन निवळल्यानंतर वाऱ्याचे प्रवाह हळूहळू सुरळीत होऊन, कर्नाटक, तामिळनाडूच्या अंतर्गत भाग, तसेच महाराष्ट्र, गोव्याकडे प्रगती होणार आहे. रविवारपर्यंत (ता. ७) कर्नाटक, तामिळनाडू, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT