कणेरी मठावर संपन्न झालेल्या दोनदिवसीय जैविक शेती कार्यशाळेची सांगता मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाली.
कणेरी मठावर संपन्न झालेल्या दोनदिवसीय जैविक शेती कार्यशाळेची सांगता मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाली.  
मुख्य बातम्या

शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जाेड मिळाली पाहिजे ः मोहन भागवत

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर  ः शेतकऱ्याचा सन्मान करताना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला मिळाली पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.  अक्षय कृषी परिवारातर्फे कणेरी मठावर दोन दिवस जैविक शेती कार्यशाळा झाली. त्यात देशभरातून शंभरहून अधिक तज्ज्ञांचा सहभाग होता. कार्यशाळेची सांगता श्री. भागवत यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता.२४) झाली. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री काडसिद्धेश्‍वर स्वामी होते. श्री. भागवत यांनी एकूणच माणसाचा विकास, शेतीचे महत्त्व आणि भविष्यातील शेतीविषयक धोरण अशा विविध अंगांनी संवाद साधला. ते म्हणाले की, सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. मात्र, त्यासाठी सामान्य शेतकऱ्याला आवश्‍यक ती सर्वतोपरी मदत केली पाहिजे. एकूणच प्रत्येक माणसाला संतुलित जीवन जगण्यासाठी तो काय खातो म्हणजेच त्याचे अन्न हाच घटक येत्या काळात महत्त्वाचा ठरणार आहे. श्री काडसिद्धेश्‍वर स्वामी म्हणाले, की सामान्य शेतकऱ्याला सेंद्रिय व गो-पालनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन तयार केले तर समाजातील प्रत्येक घटक रोगमुक्त होऊन सुखी जीवन जगेल. शेतीविषयक सरकारचे धोरणही येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे. सद्यःस्थिती पाहता जिल्ह्यात एक किंवा दोन कृषी महाविद्यालये आहेत. येत्या काळात खास सेंद्रिय शेतीविषयक प्रशिक्षण देणारी केंद्रे तयार व्हायला हवीत. सेंद्रिय शेती करणाऱ्यांचा गौरव, देशी गायींच्या विविध स्पर्धा, प्रोत्साहनपर उपक्रम राबवायला हवेत. त्याशिवाय त्यातील विविध यशोगाथाही लोकांसमोर मांडायला हव्यात. या वेळी मठाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT