Meet the needs of the family by setting up an organic kitchen garden: Patil 
मुख्य बातम्या

सेंद्रिय परसबाग उभारून कुटुंबाची गरज भागवा : पाटील

नाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने प्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. यासाठी दैनंदिन आहार हा संतुलित असावा, या साठी महिलांनी स्वतः: च्याव आपल्या कुटुंबाच्या पौष्टिक आहाराकडे नीट लक्ष द्यावे. सेंद्रिय पद्धतीने घरगुती परसबाग उभारून कुटुंबाची गरज भागवावी,’’ असे आवाहन मालेगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अमित पाटील यांनी केले.

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने प्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. यासाठी दैनंदिन आहार हा संतुलित असावा, या साठी महिलांनी स्वतः: च्या  व आपल्या कुटुंबाच्या पौष्टिक आहाराकडे नीट लक्ष द्यावे. सेंद्रिय पद्धतीने घरगुती परसबाग उभारून कुटुंबाची गरज भागवावी,’’ असे आवाहन मालेगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अमित पाटील यांनी केले. 

केंद्र सरकारच्या शेतकरी कल्याण व कृषी मंत्रालय यांचे सूचनांप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र मालेगावतर्फे  राष्ट्रीय पोषण अभियान व वृक्षारोपण कार्यक्रमाचे कृषी महाविद्यालय मालेगाव येथे नुकतेच करण्यात आले. पंचायत समिती सभापती सुवर्णा देसाई  यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश तुरबतमठ उपस्थित होते. 

तांत्रिक सत्रात  विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) पवन चौधरी यांनी ‘उपस्थितांना पोषणमूल्य आधारित परसबाग’ या विषयावर मार्गदर्शन केले. यात त्यांनी विविध पालेभाज्या, फळे यातील पोषण मूल्यांबाबत माहिती दिली. परसबाग लागवडीच्या विविध पद्धती, जसे गंगा-मा-मंडल सारख्या पद्धती विशद केल्या. विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) रूपेश खेडकर यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे संशोधित विविध पिकांच्या बायोफ़ोर्टिफाइड वाणांबाबत माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Institute : सभासदांना १८ टक्के लाभांश देणार ः ठोंबरे

Rain Crop Damage : शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा गेल्या ‘पाण्यात’

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

SCROLL FOR NEXT