चारा छावणी
चारा छावणी  
मुख्य बातम्या

चारा छावण्यांमध्ये जनावरांची वैद्यकीय सेवांसाठी हेळसांड

टीम अॅग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात ३८ छावण्यांत ४४ हजार ९७७ लहान मोठी जनावरे आहेत. परंतु जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागात ६२ पदे रिक्त असल्याने छावणीतील जित्राबांना योग्य वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने हेळसांड होताना दिसत आहे. त्यामुळे पशुपालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात छावण्या सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी झाला आहे. दिवसेंदिवस छावणीत जनावरांची संख्या वाढू लागली आहे. एकाबाजूला छावणीतील जनावरांना आधार मिळत आहे. छावणीत जनावरे मोठ्या संख्येने एकत्र आल्यावर त्यांना झालेल्या साथींचा प्रसारही होण्याचा धोका असतो. म्हणून मोठ्या प्रमाणावर लसीकरण राबवावे लागते. छावणीत जनावरांची प्रतिदिन किंवा एक दिवसाआड तपासणी करणे गरजेचे असते. परंतू पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे छावणीतील जनावरांची तपासणी केली जात नाही. त्यातच संसर्गजन्य रोगांची लसीकरण देखील झालेले नाहीत. छावणीतील जनावरांना खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागते आहे.  छावणीत जनावरांना आधार मिळत असला तरी जनावरांचे आरोग्य जपणे हे महत्त्वाचे आहे. जनावरांची काळजी घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे असते. या विभागाकडे मंजूर पदे १६४ असून त्यापैकी ९२ पदे रिक्त आहेत. जनावरांची तपासणी करण्यासाठी वेळेत अधिकारीच येत नाहीत. त्यामुळे पशुपालकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.   जत तालुक्यात सर्वाधिक छावण्या असून १८ हजार जनावरे दाखल आहेत. तालुक्यामध्ये श्रेणी एकचे १४ व श्रेणी दोनचे ९ असे एकूण २३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची १४ पदे मंजूर आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी व सहायक पशुवैद्यकीय अधिकारी अशी एकत्रित मिळून दहा पदे रिक्त आहेत. कार्यरत असलेल्या सातपैकी तीनजण प्रतिनियुक्तीवर इतर ठिकाणी काम करत आहेत. प्रत्यक्षात चारच पशुवैद्यकीय अधिकारी जत तालुक्यात काम कर आहेत. त्यामुळे छावणीतील जनावरांना वैद्यकीय सेवा मिळत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT