Market Committees should provide manpower to CCI: Sunil Kedar
Market Committees should provide manpower to CCI: Sunil Kedar 
मुख्य बातम्या

बाजार समित्यांनी सीसीआयला मनुष्यबळ पुरवावे ः सुनील केदार

टीम अॅग्रोवन

वर्धा ः सीसीआयकडे आवश्‍यक ग्रेडर कमी आहेत. त्यामुळे बाजार समित्यांनी त्यांच्याकडचे मनुष्यबळ सीसीआयला पुरवावे. या माध्यमातून रोज १०० शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी होऊन पावसाळ्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी शक्‍य होईल, असा विश्‍वास पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्‍त केला.

मंत्री श्री. केदार यांनी जिल्ह्यातील १४ जिनींग व प्रेसिंगला भेट दिली. संकलन केंद्रावर कापूस खरेदीतील समस्या बाजार समिती सचिव व ग्रेडरच्या माध्यमातून त्यांनी जाणून घेतल्या. त्यासोबतच जिनींग संचालकांसोबतही त्यांनी चर्चा केली. सेलू येथील गोल्ड फायबर जिनींग येथे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, तहसीलदार महेंद्र सोनवणे, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, जिनींग संचालक सिंघानिया, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, आमदार समीर कुणावार यावेळी उपस्थित होते.

शासकीय तसेच शनिवारी येणाऱ्या सुटीच्या दिवशी देखील कापूस खरेदी सुुरू ठेवावी. जिल्ह्यातील एकही शेतकरी कापूस विक्री पासून वंचित राहू नये यासाठी बाजार समित्यांनी सीसीआयसोबत समन्वय साधून काम करावे, अशी सूचनाही केदार यांनी केली. जिल्ह्यात ११ कापूस खरेदी केंद्र सुरू असून तीन केंद्र नव्याने सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर येत्या दोन दिवसांत आणखी तीन केंद्र सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी दिली.

कापूस गाठींची उचल करा खरेदी केंद्रावरील कापसाची प्रोसेसिंग करुन गाठी बनविण्यात येतात. मात्र, गाठी व सरकीची उचल पणन महासंघाव्दारे होत नाही, यामुळे साठवणुकीची समस्या निर्माण होत असल्याचा मुद्दा जिनींग व्यावासायिकांनी मांडला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT