solapur
solapur  
मुख्य बातम्या

मनीषाताईंनी विकसित केले तीन गुंठ्यांत ७५ पिकांचे मॉडेल 

Sudarshan Sutaar

सोलापूर ः पोषण मूल्यावर आधारित अवघ्या तीन गुंठ्यांत खैरेवाडी (ता. माढा) येथील महिला शेतकरी मनीषा भागवत भांगे यांनी स्वतःच्या अनुभवावर विविध प्रकारच्या ७५ पिकांचे शेती मॉडेल विकसित केले आहे. नऊ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर आज खऱ्या अर्थाने या शेती मॉडेलला मूर्त स्वरूप मिळाले असून, त्यांच्या या मॉडेलच्या पाहणीसाठी जिल्ह्यासह नजीकच्या जिल्ह्यातूनही शेतकरी सातत्याने त्यांच्या शेतावर येतात. 

शाळेचा उंबरठाही न ओलांडलेल्या ६० वर्षीय मनीषाताई पहिल्यापासून शेतीत राबतात. घरची कमी शेती असूनही, आहे त्या शेतीलाच संधी मानून त्यात आपल्यातील प्रयोगशीलता त्यांनी सिद्ध करून दाखवली आहे. श्रीमती भांगेताईंनी विकसित केलेल्या या मॉडेलच्या माध्यमातून पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने उत्पादन घेतले जाते. वार्षिक किमान चार क्विंटलपेक्षाही जास्त फळे आणि पाच सदस्यांच्या कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढा भाजीपाला आणि धान्य या तीन गुंठ्यांतून मिळते, असा त्यांचा दावा आहे. यातील फळे आणि भाज्या आपल्या गरजेपुरत्या घरी वापरल्या जातात आणि उरलेली फळे आणि भाज्या बाजारात विक्री केल्या जातात.  काय आहे मॉडेल 

  • साठ फूट लांब, ५० फूट रुंद जागेमध्ये जागेचा परिणामकारक वापर करून विविध पिकांची लागवड. 
  • पेरू चिकू, सीताफळ, आंबा, अंजीर, लिंबू, पपई, आवळा, नारळ, केळी, मोसंबी, खारीक, बदाम यासह २० प्रकारच्या फळ झाडांची लागवड केली आहे. 
  • साठ फूट बाय दहा फूट जागेमध्ये सात वाफे तयार करून या वाफ्यांमध्ये वर्षभराच्या चक्रामध्ये फळभाज्या, पालेभाज्या यांची लागवड केली जाते. त्यात रताळे, मेथी, शेपू, पालक, भेंडी, गवार, वांगी, टोमॅटो, मुळा याची लागवड केली जाते. तसेच दोडके, भोपळा, कारले, पावटा, घेवडा या वेलवर्गीय भाज्या फळझाडांवर चढवल्या जातात. त्याशिवाय पुदिना, कोरफड, तुळस, इन्शुलिन, शतावरी, अश्‍वगंधा, अक्कलकारा, आवळा, अडुळसा अशी औषधी वनस्पतीचीही लागवड केली आहे. 
  • परागीभवनासाठी झेंडू, निशिगंधा, मोगरा, गुलाब, मधुमालती, चिनी गुलाब, लिली, कोरांटी यांच्या विविध प्रजातींची लागवड केलेली आहे. त्याशिवाय त्या त्या हंगामात धान्य पिकवले जाते. 
  • प्रतिक्रिया प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या कुटुंबाची पोषण सुरक्षा निश्‍चित करणारा हा शेती प्रयोग कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निश्‍चितच प्रत्येक शेतकऱ्याने करायला हवा आणि आपल्या कुटुंबाचा बाहेर जाणारा पैसा तर थांबवावा, सोबतच कुटुंबाचा आरोग्यही जपावे.  - श्रीमती मनीषाताई भांगे, खैरेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    SCROLL FOR NEXT