संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पणन मंडळाचे यंदा अडीच हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट

टीम अॅग्रोवन

पुणे : हापूस आणि केशर आंब्याच्या निर्यातीला चालना मिळावी, यासाठी राज्य पणन मंडळाच्या वतीने यंदा सुमारे अडीच हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. गेल्या वर्षी (२०१८-१९) मध्ये सुमारे बाराशे टन आंबा निर्यात झाला होता.

याबाबतची माहिती पवार यांनी दिली. ते म्हणाले, की कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केसर आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पणन मंडळाने नाचणी (जि. रत्नागिरी), जामसंडे (जि. सिंधुदुर्ग), जालना, लातूर, बीड आणि वाशी (नवी मुंबई) येथे निर्यात सुविधा केंद्रे उभारली आहेत. या विविध केंद्रांवरून विविध देशांसाठीच्या विविध प्रक्रिया आंब्यावर केल्या जातात. गेल्या वर्षी सुमारे बाराशे टन आंबा निर्यात करण्यात आला असून, यंदा सुमारे अडीच हजार टन आंबा निर्यातीचे नियोजन करण्यात आले आहे.

आंबा निर्यातीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाच्या वतीने वेंगुर्ला आणि रत्नागिरी येथे कार्यशाळा घेण्यात आल्या; तसेच निर्यातदार उद्योजक तयार व्हावेत, यासाठी कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पाच कार्यशाळा देखील घेण्यात आल्या. प्रशिक्षणार्थींना ५ हजार रुपये  कृषी विभागाच्या वतीने देण्यात आले आहे; तर नुकतीच वेंगुर्ला आणि रत्नागिरी येथे बायर सेलर मीटदेखील घेण्यात आली असून, या वेळी ४०० शेतकरी, ३० निर्यातदार आणि १५ प्रक्रियादार उपस्थित होते, असेही पवार यांनी सांगितले.     देशनिहाय आंबा निर्यातीचे उद्दिष्ट (टनांत)

  • देश    उद्दिष्ट (टन)  विकिरण प्रक्रिया
    1. अमेरिका  - ७५० 
    2. आॅस्ट्रेलिया - १०० 
    3. मलेशिया - ५० 
  • व्हेपर हिट ट्रिटमेंट प्रक्रिया
    1. जपान  - ५०
    2. दक्षिण कोरीया - ५० 
    3. युरोप  - ६० 
    4. न्युझीलंड - ५० 
    5. अमेरिका, आॅस्ट्रेलिया - १०० 
    6. मॉरेशिअस - ५०
  • हॉट वॉटर ट्रिटमेंट प्रक्रिया
    1. युरोप - ३५० 
    2. अमेरिका - आॅस्ट्रेलिया  - ३५० 
    3. रशिया  -  ४० 
    4. इराण -  ६० 
  • रत्नागिरी सुविधा केंद्र 
    1. अमेरिका-आॅस्ट्रेलिया  -  १०० टन 
    2. युरोप मध्यपूर्व अशियायी देश, रशिया इतर - १०० टन

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

    Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

    Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

    Summer Heat : वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका सुरूच

    Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

    SCROLL FOR NEXT