Mall for sale of farm produce of women farmers companies: Sule 
मुख्य बातम्या

महिला शेतकरी कंपन्यांचा शेतमाल विक्रीकरिता मॉल ः सुळे

महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या शेतमाल विक्रीसाठी नाशिकला प्रायोगिक तत्त्वावर ‘मॉल’ उभारण्यासाठी आणि पुढील पाच वर्षात हा प्रयोग राज्यात राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

टीम अॅग्रोवन

नगर ः राज्यातील महिलांनी शेतकरी उत्पादन कंपन्या केल्या. पृथाशक्ती महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे फेडरेशन झाले. शेतमाल खरेदी-विक्रीतून महिला कोट्यवधींची उलाढाल करतात ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आता केवळ उत्पादन नाही तर मार्केटिंग महत्त्वाचे असून त्यासाठी महिलांनी विश्वासार्हता मिळवणे गरजेचे आहे. महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या शेतमाल विक्रीसाठी नाशिकला प्रायोगिक तत्त्वावर ‘मॉल’ उभारण्यासाठी  आणि पुढील पाच वर्षात हा प्रयोग राज्यात राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

जागतिक महिला दिनानिमित्त सोमवारी (ता. ७) नगर येथे महिला शेतकरी कंपनीच्या ‘पृथाशक्ती’ फेडरेशनतर्फे महिला मेळावा घेण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, आमदार संग्राम जगताप, ‘शिवप्रहार’चे नेते संजीव भोर, नाफेडचे संचालक राजबीरसिंग, मार्केटिंग फेडरेशनचे संचालक कार्यकारी संचालक सुधाकर तेलंग यांच्यासह फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष डॉ. भाग्यश्री टिळेकर यांनी प्रस्तावित करून फेडरेशननी माहिती दिली.  

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘महिला दिन ही संकल्पनाच मला मान्य नाही. वर्षभरातील ३६५ दिवस माणुसकीचे असले तर आम्हाला महिला किंवा पुरुष दिन साजरा करण्याची गरज पडणार नाही. महिलांच्या शेतकरी कंपन्या झाल्या, फेडरेशन झाले, महिला शेतमाल खरेदी करू लागल्या, मोठी आर्थिक उलाढाल होऊ लागली, हेच खरे परिवर्तनाचे प्रतीक आहे. शेतमाल खरेदीसोबत मार्केटिंगही महत्त्वाचे आहे. महिला कंपन्यांनी खरेदी केलेल्या शेतमालाची विक्री करण्यासाठी नाशिकला मॉल उभा करण्याची मागणी केली. यासाठी सरकार काम करेल. ते यशस्वी करून पुढील पाच वर्षात राज्यातील जिल्हा, तालुका पातळीवर हा हा उपक्रम नेण्यासाठी माझा प्रयत्न असेल. सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी मुंबईतही मॉल असावे याबाबत मी विचार करत आहे.

 पोरं आणली, ते सरकारचे कामच आहे सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘लाल दिवे फिरवण्यासाठी नसतात, तर समाजासाठी काम करण्याचे सरकारचे काम आहे. युद्धाच्या परिस्थितीत युक्रेनवरुन मुलांना आणले म्हणजे उपकार केले नाहीत. सरकारचे ते कामच आहे. लोकांसाठी काम करत असल्याने आम्ही  राजकारणात यशस्वी आहोत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा : कृषिभूषण विजयअण्णा बोराडे

Drought Migration Issue: रोजगारासाठी गाव सोडण्याची वेळ...!

Khet Bachao Abhiyan: शेतीच्या सुपीकतेसाठी ‘शेत वाचवा’ अभियान: केंद्रीय कृषिमंत्र्यांची घोषणा

Turmeric Production Decline: हिंगोली, परभणी जिल्ह्यांत हळद उत्पादनात घटीची शक्यता

Crop Loan Disbursment: राष्ट्रीयीकृत बँकांचे केवळ आठ टक्के पीककर्ज वितरण: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

SCROLL FOR NEXT