जळगाव जिल्ह्यातील बाजारांमध्ये मका दरात सुधारणा
जळगाव जिल्ह्यातील बाजारांमध्ये मका दरात सुधारणा 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यातील बाजारांमध्ये मका दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा, रावेर, जळगाव आणि चाळीसगाव येथील बाजार समितीमध्ये मक्‍याची आवक घटली असून, दरात सुधारणा झाली आहे.  जळगाव बाजार समितीत मागील आठवड्यातच आवक निम्म्यावर आली आहे. या बाजारात प्रतिदिन ४०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. चाळीसगाव बाजार समितीत प्रतिदिन १८०० क्विंटलपर्यंत आवक आहे; तर रावेर व चोपडा बाजार समितीत मागील पंधरवड्यात प्रतिदिन ११०० क्विंटल आवक झाली. आवक कमी होत असतानाच दरात सुधारणा होत आहे. या महिन्याच्या सुरवातीला महिनाभर उधारीने १२०० रुपये प्रतिक्विंटल या दरात बाजार समित्यांमध्ये मक्‍याची खरेदी केली जात होती. मका विक्रीनंतर लागलीच रोकड हवी असेल, तर १०७५ रुपये प्रतिक्विंटलचे दर दिले जात होते; परंतु जिल्ह्यात रब्बी हंगामात मक्‍याची पेरणी किंवा लागवड कमी झाली होती. रावेर, यावल भागात हरभऱ्याची पेरणी अधिक होती. पेरणी फक्त चोपडा, जळगाव, पाचोरा, मुक्ताईनगर भागात बऱ्यापैकी झाली होती. मकामळणी फेब्रुवारीतच अनेक ठिकाणी सुरू झाली. सुरवातीलाही कमी दर होते. मार्चअखेरपर्यंत कमाल मका उत्पादकांनी मळणी करून मका बाजारात विक्रीसाठी आणला. त्यामुळे प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्‍याची आवक घटली आहे. पुढील आठ १० दिवसांत आवक आणखी कमी होईल. मका उपलब्ध होत नसल्याने अनेक व्यापारी थेट गावांमध्ये जाऊन मक्‍याची खेडा खरेदी करीत आहेत. ही खरेदी आणखी १० ते १२ दिवस सुरू राहील. यानंतर आवक जवळपास शून्यावर राहील, असे व्यापारी व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT