maize
maize  
मुख्य बातम्या

गोदामाअभावी मका खरेदी बंद 

टीम अॅग्रोवन

चंद्रपूर ः गोंड पिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे सुरू करण्यात आलेले मका खरेदी केंद्र महिनाभरातच बंद करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. येथील खरेदी पूर्ववत व्हावी याकरिता गोदामातील मालाची उचल करावी, अशी मागणी बाजार समिती संचालक विनोद नागापुरे यांनी केली आहे.  गोंड पिंपरी परिसरात लागवड क्षेत्र वाढीस लागल्याने उत्पादित मक्याची हमीभावाने खरेदीची मागणी होऊ लागली. त्याची दखल घेत प्रशासनाकडून भंगाराम तळोधी येथे हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले. या परिसरातील २० ते २५ गावातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. परंतु केंद्र सुरू होऊन महिनाभराचा कालावधीदेखील झाला नसताना हे केंद्र बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढविली आहे. मका साठवणुकीसाठी असलेले गोदाम भरल्याने हा निर्णय घ्यावा लागला.  विशेष म्हणजे गोदामाची व्यवस्था करण्यात यावी किंवा असलेल्या गोदामातील मालाची उचल करावी, अशी मागणी दहा दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोणत्याच प्रकारच्या हालचाली न झाल्याने खरेदी केंद्र अखेरीस बंद झाले. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. परिसरातील अनेक शेतकरी मका विकायच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु जोपर्यंत गोदामातील मालाची उचल होत नाही तोवर नव्याने मका खरेदी न करण्याचा निर्णय संबंधित विभागाने घेतला आहे.  दरम्यान, मका खरेदीला शासनाने शुक्रवार (ता. १७) पर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु या मुदतवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याची दखल घेत तत्काळ गोदामातील मालाची उचल करावी, अशी मागणी विनोद नागपुरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT