औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल हमीभावाने मका खरेदी
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल हमीभावाने मका खरेदी 
मुख्य बातम्या

औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल हमीभावाने मका खरेदी

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या चार केंद्रांवरून जवळपास ४६९७. ५० क्‍विंटल मकाची खरेदी करण्यात आली. दोन केंद्रांवरून १६७ क्‍विंटल मुगाची खरेदी झाली. उडदासाठी एका केंद्रावर जवळपास आठ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु त्यांच्याकडून खरेदीसाठी प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे सोयाबीनची हमी दराने खरेदी करण्यासाठी प्रतिसादच मिळत नसल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यातील करमाड, कन्नड, वैजापूर व गंगापूर येथे हमी दराने मका खरेदी केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आली. त्यामाध्यमातून करमाडच्या केंद्रावर जवळपास १७९ शेतकऱ्यांनी मकाची हमी दराने खरेदी व्हावी म्हणून नोंदणी केली. त्यापैकी आजपर्यंत जवळपास ११२ शेतकऱ्यांकडून २२६१ क्‍विंटल मकाची खरेदी झाली.

कन्नडच्या केंद्रावर १४४ शेतकऱ्यांनी मका खरेदीसाठी नोंद केली. त्यापैकी ६० शेतकऱ्यांकडील १५२८ क्‍विंटल मका खरेदी झाली. वैजापूरच्या केंद्रावर नोंदणी केलेल्या २१५ शेतकऱ्यांपैकी ९ शेतकऱ्यांकडून १२२.५० क्‍विंटल मकाची खरेदी करण्यात आली. गंगापूरच्या केंद्रावर ३४९ नोंदणी, तर त्यापैकी ८१ शेतकऱ्यांकडील ७८६ क्‍विंटल मकाची खरेदी करण्यात आली.

वैजापूर व गंगापूरच्या खरेदी केंद्रावर मकाची सुरू असलेली खरेदी हळू होत असल्याची स्थिती आहे. मका खरेदीसाठी जवळपास सहा केंद्रांना जिल्ह्यात मंजुरी मिळाली, त्यापैकी केवळ चारची खरेदी केंद्रे आजवर सुरू झाली आहेत. दुसरीकडे मुगाची खरेदी करण्यासाठी खुल्ताबाद व वैजापूर येथे केंद्रे सुरू करण्यात आली. खुल्ताबादच्या केंद्रावर १४३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १०६ शेतकऱ्यांकडील १२६.१० क्‍विंटल, वैजापूरच्या केंद्रावर नोंदणी केलेल्या ३२ शेतकऱ्यांपैकी २१ शेतकऱ्यांकडून ४०.९० क्‍विंटल खरेदी झाली. खुलताबाच्या खरेदी केंद्रावर आठ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT