शक्तिप्रदर्शनाद्वारे महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल
शक्तिप्रदर्शनाद्वारे महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल 
मुख्य बातम्या

शक्तिप्रदर्शनाद्वारे महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

टीम अॅग्रोवन

नाशिक  : शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे, भारती पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी (ता. ८) दाखल केला. ढोलताशांचा गजर करून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात यावेळी फेरी काढून शक्तिप्रदर्शन केले.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री दादा भुसे, माजीमंत्री बवनराव घोलप, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार बाळासाहेब सानप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शितल सांगळे, आमदार देवयानी फरांदे, राहुल आहेर, सिमा हिरे, योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, किशोर दराडे उपस्थित होते.

दरम्यान, बी.डी.भालेकर हायस्कुल मैदान, कवी कालिदास कलामंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी फेरी निघाली. यावेळी जिल्हाभरातून शिवसेना, भाजप व मित्रपक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे विकास महंते हे होते. यावेळी नेत्यांनी उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

Summer Heat : वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका सुरूच

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

SCROLL FOR NEXT