‘वीजचोरी कळवा, बक्षीस मिळवा’ महावितरणचे अावाहन 
मुख्य बातम्या

‘वीजचोरी कळवा, बक्षीस मिळवा’ महावितरणचे अावाहन

टीम अॅग्रोवन

अकोला : राज्यात वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी महावितरणने ‘वीजचोरी कळवा आणि १० टक्के रकमेचे घसघशीत बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

वीज मीटरमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करून होणाऱ्या वीजचोरीची माहिती असणाऱ्यांनी पुढाकार घेत यासंबंधी माहिती द्यावी, माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. ही योजना आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील वीजचोरी कळवणाऱ्या ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनाही बक्षीस मिळवून देऊ शकणार अाहे.

यापूर्वी वीजचोरीची माहिती कळवल्यानंतर एक हजार रुपयांचे बक्षीस होते, मग ती वीजचोरी लाखो रुपयांची का असेना. त्यामुळे हवा तितका प्रतिसाद नव्हता. आता वीजचोरीची माहिती कळवणाऱ्यास वीजचोरीच्या एकूण रकमेपैकी १० टक्के रक्कम बक्षीस देण्याचा निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे.

या उपक्रमात ५० हजार रुपयांपर्यंतच्या बक्षिसाची रक्कम मंजूर करण्याचे अधिकार ‘महावितरण’च्या क्षेत्रीय कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत. एक लाखापर्यंतच्या बक्षिसाचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले आहेत. बक्षिसाची रक्कम एक लाखापेक्षा अधिक होत असल्यास ती देण्याचे अधिकार मुख्य अभियंत्यांना अाहेत.

वीजचोरी कळविणाऱ्यांना २० हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोखीने, तर त्यावरील पैसे नेटबँकिंगच्या माध्यमातून देण्यात येतील. नागरिकांनी वीजचोरीची माहिती ‘महावितरण’च्या संकेतस्थळावरील ‘रिपोर्ट एनर्जी थेफ्ट’ येथे कळवावी. तसेच, ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना वीजचोरीची माहिती थेट दक्षता व सुरक्षा संचालकांना दूरध्वनीवरून देता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT