महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन प्रशिक्षण 
मुख्य बातम्या

महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन प्रशिक्षण

‘डिजिटल विपणन शास्त्राची मूलभूत तत्त्वे’ या विषयावर मंगळवार (ता. ७) ते शनिवार (ता.११) याकालावधीत ऑनलाइन प्रशिक्षण घेण्याचे नियोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठात करण्यात आले आहे.

टीम अॅग्रोवन

नगर  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कामकाजावरही काहीसा परिणाम होत असल्याचे दिसत आहे. मात्र विद्यापीठाने ऑनलाइन कामकाज सुरु ठेवण्यावर भर दिला आहे. ‘डिजिटल विपणन शास्त्राची मूलभूत तत्त्वे’ या विषयावर मंगळवार (ता. ७) ते शनिवार (ता.११) याकालावधीत ऑनलाइन प्रशिक्षण घेण्याचे नियोजन विद्यापीठात करण्यात आले आहे.   जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात आले आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ते बंद असल्याने येथील प्रशिक्षणाला अडचण आली. मात्र या प्रकल्पांतर्गत डिजिटल विपणन शास्त्राची मूलभूत तत्त्वे  या विषयावर एका आठवड्याचे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्याचे नियोजन केले आहे. त्याला आजपासून सुरवात होत आहे. हे प्रशिक्षण विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकरिता आयोजित करण्यात आले आहे. घरबसल्या ऑनलाइन पद्धतीद्वारे हे प्रशिक्षण घेता येणार आहे. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, डिजिटल मार्केटिंगसाठी सोशल मिडीयाचा (सामाजिक माध्यमे) वापर, ई-मार्केटिंग, मार्केटिंगसाठी गुगल, युट्युबचा वापर या विषयांचा समावेश असल्याचे  प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे यांनी सांगितले.  लॉकडाऊनच्या काळात महात्मा फुले कृषी विद्यापीठ विविध शिक्षण उपक्रमांमध्ये ऑनलाइन पद्धतीचा वापर करत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT