madgyal sheep  
मुख्य बातम्या

माडग्याळ मेंढी संशोधन केंद्राचा प्रस्ताव लालफितीत 

उष्ण तापमान, अवर्षणप्रवण, प्रतिकूल वातावरणात तग धरणारे म्हणून माडग्याळ मेंढीची अशी ओळख आहे.

टीम अॅग्रोवन

सांगली ः उष्ण तापमान, अवर्षणप्रवण, प्रतिकूल वातावरणात तग धरणारे म्हणून माडग्याळ मेंढीची अशी ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी माडग्याळ (ता. जत) येथे या मेंढी संशोधन, पैदास व संवर्धन केंद्र सुरू केले जाणार असल्याची घोषणा तत्कालीन सरकारने केली होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मेंढी संशोधन, पैदास व संवर्धन केंद्राचा प्रस्ताव दफ्तर दिरंगाई अडकला आहे.  जत तालुक्‍यात शेळ्यांची संख्या १ लाख १ हजार ४३०, मेंढ्यांची संख्या ५६ हजार २५९ इतकी आहे. खिलारी जनावरे, माडग्याळ मेंढीसाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश यामुळे येथील मेंढी काटक असते. या जातीचे जतन, पैदास आणि संवर्धनाचे काम प्रभावीपणे होणे आवश्‍यक आहे. म्हणून माडग्याळ येथे मेंढीचे संशोधन होऊन उत्तम प्रकारची प्रजाती निर्माण व्हावी, उत्पादन वाढवावे याचा पशुपालकांना फायदा व्हावा, लोकांचे जीवनमान उंचवावे, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राष्ट्रीय शेळी-मेंढी संशोधन केंद्र व्हावे, ही फार वर्षांपूर्वीची मागणी आहे.  तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व मुख्य सचिव हे माडग्याळ येथे २०१८ मध्ये दौऱ्यावर आले होते. मेंढीची पाहणी करून त्यांनी मेंढी संशोधन, पैदास व संवर्धन केंद्र सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने खंडोबा मंदिराजवळील जागा देण्यास संमती दिली. प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला. मात्र हा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून शासन दरबारी रखडला आहे. पशुसंवर्धन विभागाने पाठपुरावा करून माडग्याळ मेंढी संशोधन, जतन, पैदास केंद्र सुरू करावे, अशी मागणी पशुपालकांतून होत आहे.  माडग्याळ मेंढीची वैशिष्ट्ये  माडग्याळ, परिसरातील मेंढपाळांनी ‘माडग्याळ मेंढी’चे संवर्धन आणि संगोपन केले आहे. पांढरा रंग व त्यावर तपकिरी रंगाचा भाग, फुगीर नाक, लांब पाय, निमुळती व लांब मान, शिंगे नसलेली ही मेंढी, काटक व अवर्षण स्थितीत टिकाव धरून राहण्याची क्षमता असलेली आहे. 

५५ वर्षांचा बाजार  माडग्याळचा शेळी-मेंढीचा शुक्रवारचा आठवडा बाजार प्रसिद्ध आहे. ५५ वर्षांची परंपरा आहे. माडग्याळ मेंढी, शेळी, बोकड खरेदीसाठी मुंबई, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटकातील व्यापारी बाजारात येतात. कोट्यवधींची उलाढाल होते. 

रांजणी येथे संवर्धन केंद्र  केंद्राच्या कृषी मंत्रालय व पशुसंवर्धन विभागाचा रांजणी (कवठेमहांकाळ) येथे माडग्याळ मेंढी संवर्धन व विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. माडग्याळ मेंढी व नर विकत घेऊन प्रक्षेत्रावर जतन, पैदास, संवर्धन केले जात आहे. 

प्रतिक्रिया माडग्याळ मेंढी संशोधन, संवर्धन केंद्र सुरू करून पशुपालन व्यवसायाला चालना द्यावी. शेतीला जोड व्यवसाय विकसित होईल.  - सुरेश हक्के, माडग्याळ, ता. जत, जि. सांगली 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT