रहाटी, जि.परभणी ः येथे सोमवारी (ता.२) कर्जमाफी यादीचे चावडी वाचन करण्यात आले.
रहाटी, जि.परभणी ः येथे सोमवारी (ता.२) कर्जमाफी यादीचे चावडी वाचन करण्यात आले. 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात विविध ठिकाणी चावडीवाचन सुरू

Santosh Munde

औरंगाबाद/ परभणी  : मराठवाड्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरू असतानाच निवडणुका नसलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफीच्या अर्जाचे चावडीवाचन सुरू आहे. मागील चार-पाच दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात २९ सप्टेबर ते २ ऑक्‍टोबरदरम्यान ३९८ ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफी अर्जाच्या  वाचनाची प्रक्रिया सुरू होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४५७  ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफीच्या अर्जाचे चावडीवाचनाची प्रक्रिया सुरू होती.

तर बीड जिल्ह्यातही निवडणूक असलेल्या ग्रामपंचायती वगळता कर्जमाफी अर्ज चावडीवाचनाची प्रक्रिया सुरू होती. जालना जिल्ह्यात मंगळवारी (ता.२६) विशेष ग्रामसभा घेऊन ४८५ ग्रामपंचायतींमध्ये चावडीवाचन करण्यात आले. जालन्यात ५५४ ग्रामपंचायतींमध्ये चावडीवाचन करण्यात आले.

दरम्यान नांदेड, हिंगोली जिल्ह्यात सोमवारी (ता.२) विशेष ग्रामसभांमध्ये चावडीवाचन करण्यात आले. शेतकऱ्यांचे आक्षेप असल्यास तीन दिवसांत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सादर करता येणार आहेत. परभणीत सोमवारी २९२ ग्रामपंचायतींमध्ये चावडीवाचन करण्यात आले. शेतकऱ्यांनी कुटुंबातील किती सदस्यांच्या नावावर कर्ज घेतले, अर्ज भरलेला शेतकरी इन्कम टॅक्स भरणा करतो का, कर्जमाफी अर्ज भरणारी व्यक्ती शासकीय सेवेत आहे का, याबाबतची माहिती चावडीवाचनातून मिळविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

SCROLL FOR NEXT