भारनियमन
भारनियमन 
मुख्य बातम्या

बेकायदा भारनियमनाने ग्रामीण भागाची फसवणूक : होगाडे

विजय गायकवाड

मुंबई : महावितरणच्या भोंगळ, नियोजनशून्य कारभारामुळे राज्यावर भारनियमनाचे संकट उद्भवले आहे. २५०० मेगावॉट विजेचा तुटवडा असताना ५००० मेगावॉट विजेचा तुटवडा असल्याचे सांगून ग्रामीण महाराष्ट्राची फसवणूक केली जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली.

श्री. होगाडे म्हणाले, की जनतेच्या वाढत्या रोषानंतर महावितरणच्या अ आणि ब ग्राहक श्रेणीतील भारनियमन टप्प्याटप्प्याने मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईतील वीजग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला. पण उर्वरित क ते जी ३ या ग्राहक श्रेणीतील सर्व भारनियमन मागे घेतले पाहिजे. वास्तविक विजेचा तुटवडा २५०० मेगावॉट आहे.

त्यानुसार मंजूर भारनियमन न करता महावितरण मनमानी पद्धतीने भारनियमन करत असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळ्यात १९००० मेगावॉट वीज देणाऱ्या महावितरणला पावसाळ्यात १५४०० मेगावॉट वीजही देता येत नाही. त्यामुळे महावितरणाच्या बेकायदा भारनियमनाला आव्हान देणारी याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली.

नियोजनाअभावी बट्ट्याबोळ पुरेशा वीजपुरवठ्यासाठी एकतर बंद ठेवलेले प्रकल्प सुरू करून पुरेशी वीज उपलब्ध करून दिली पाहिजे. विलंब लागत असेल तर बाजारातून अथवा खासगी पुरवठादारांकडून अल्प मुदतीने वीज खरेदी करून ग्राहकांना दिली पाहिजे. दरवर्षी सणासुदीच्या काळात विजेची मागणी वाढते हे जगजाहीर आहे. तरीही ग्राहकांना पुरेशी वीज देता येत नाही. विजेचा बट्ट्याबोळ हा केवळ योग्य नियोजनाअभावी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT