पाने खाणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली
पाने खाणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली 
मुख्य बातम्या

पाने खाणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली

टीम अॅग्रोवन

नांदेड : नांदेड तालुक्यातील सहा ते सात गावांतील सोयाबीन पिकावर तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळी (स्पोडोप्टेरा लिटुरा)च्या प्रादुर्भावाने आर्थिक नुकसानपातळी ओलांडली आहे. शेंगा भरण्याच्या अवस्थेतील मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

उंट अळी तसेच शेंगा पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव झाल्याचेदेखील आढळून आले आहे. थुगाव येथील शेतकऱ्यांनी किडीच्या प्रादुर्भावाभावाबाबत कृषी विभागाला कळविल्यानंतर बुधवारी (ता. ४) तालुका कृषी अधिकारी विनायक सरदेशपांडे, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ माणिक कल्याणकर, मंडळ कृषी अधिकारी पी. एस. पाटील, कृषी सहायक व्ही. आर. मोरताडे यांच्या पथकाने नांदेड तालुक्यातील थुगाव, सुगाव, पिंपळगाव कोबोरगाव, नाळेश्वर या गावातील तसेच गुरुवारी (ता. ५) भायेगाव येथील सोयाबीन पिकाची पाहणी केली.

या गावात शेंगा भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन पिकावरील तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Spodopetra litura) या किडीचा प्रादुर्भावाने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्याचे आढळून आले. सोयाबीनच्या पानांची चाळणी झाली आहे. कुरतडून शेंगांना छिद्र पाडल्याचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे. काही शेतातील पिकाची मोठ्या प्रमाणात कायिक वाढ झाल्याने किडीमुळे शेंगांचे प्रमाण अत्यल्प आढळून आले. जमिनीवर, बांधावर, रस्त्यावर इतर पिकावर आळ्यांचा मोठ्या प्रमाणात संचार असल्याचे आढळून आला. उंट अळी आणि शेंगा पोखरणारी अळी या किडींचासुद्धा प्रादुर्भाव येथे झाला आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ते सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. या किडीची अळी अवस्था साधारणतः ११ ते २० दिवसांपर्यंत असते. या दरम्यान अळी ५ अवस्थेतून जाते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT