दर कमी होताच; शेतकऱ्यांनी ठेवले सोयाबीन तारण !
दर कमी होताच; शेतकऱ्यांनी ठेवले सोयाबीन तारण ! 
मुख्य बातम्या

दर कमी होताच; शेतकऱ्यांनी ठेवले सोयाबीन तारण !

टीम अॅग्रोवन

लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या शेतीमाल तारण योजनेस शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारपर्यंत (ता.१) जवळपास २४२ शेतकऱ्यांनी एकूण ८,७५० क्विंटल सोयाबीनचा शेतीमाल तारण ठेवत या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती सभापती ललीतकुमार शहा यांनी दिली. बाजारपेठेवर लक्ष ठेवून भावातील शेतीमालाच्या दरात मिळणारा फायदा पदरी पाडून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आर्थिक गरजा तत्काळ भागविण्यासाठी शेतीमाल तारण योजना ही शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. लातूर बाजार समितीच्या वतीने ऑक्टोबरमध्ये १८ तारखेला शेतमाल तारण योजना सुरू करण्यात आली. सध्या सोयाबीनला मिळणारा भाव लक्षात घेऊन अनेक शेतकरी या योजनेतर्गत सोयाबीन तारण ठेवत लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी शेतीमाल तारण ठेवलेल्या सोयाबीनच्या शेतीमालास चालू बाजार भावाच्या ७५ टक्के रक्कम केवळ ६ टक्के व्याजदराने ६ महिन्यांच्या कालावधीसाठी शेतकऱ्यांना देण्यात येते.  या सहा महिन्यांच्या कालावधीत सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यास शेतकरी तारण मालाची विक्री करून मिळणारा फायदा पदरी पाडून घेऊ शकतात. त्यामुळेच या योजनेस अल्पावधीतच शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या योजनेत गोदाम भाडे आकारले जात नाही. तसेच शेतीमालास विमा संरक्षण आहे. त्याची पूर्ण विमा रक्कम बाजार समिती भरते. या योजनेचा शेतकऱ्यांनी नास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही सभापती ललीतकुमार शहा यांनी केले आहे. सव्वातीन कोटींची शेतकऱ्यांना उचल... लातूर बाजार समितीच्या शेतीमाल तारण योजनेत १७४ शेतकऱ्यांनी ६५२३.४० क्विंटल सोयाबीन तारण ठेवले असून, शेतकऱ्यांनी जवळपास २ कोटी ५९ लाख रुपये उचल घेतली आहे. उपबाजार पेठ-मुरूड येथे १०००  टनांचे नवीन गोडाउन बांधले असून, तेथे ६८ शेतकऱ्यायांनी २२२६.७२ क्विंटल सोयाबीन तारण ठेवले आहे. त्यावर शेतकऱ्यानी जवळपास ६९ लाख रुपये  उचल घेतली आहे. एकूण २४२ शेतकऱ्यांनी ८,७५० क्विंटल शेतीमाल तारण ठेवून ३ कोटी २९ लाख ५४ हजार १३० रुपये रक्कम उचल घेतल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही

Electoral Bond : निवडणूक रोखे छपाईप्रश्नी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसला नोटीस

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

SCROLL FOR NEXT