In Latur Agriculture Department, gram, safflower crop is in maturity stage 
मुख्य बातम्या

लातूर कृषी विभागात हरभरा, करडईचे पीक पक्वतेच्या अवस्थेत

लातूर : लातूर कृषी विभागातील नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील रब्बी हंगामातील हरभरा व करडईचे पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे.

टीम अॅग्रोवन

लातूर : लातूर कृषी विभागातील नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील रब्बी हंगामातील हरभरा व करडईचे पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे. मका आणि रब्बी ज्वारीवर काही ठिकाणी अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

लातूर कृषी विभागात रब्बीची सरासरीच्या १४० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विभागात रब्बीचे १० लाख ८६ हजार ६१० हेक्टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात १५ लाख २६ हजार ६१८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त, तर इतर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास सव्वा ते दीडपट क्षेत्रावर पेरणी झाली आहे.  पीकनिहाय क्षेत्र, स्थिती

रब्बी ज्वारी ः लातुर विभागात ज्वारी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३६५७३३ हेक्टर आहे. २९६९५३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या ८१ टक्के पेरणी झाली आहे. पीक सद्या दाणे पक्वतेच्या अवस्थेत असून काही ठिकाणी रब्बी ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

गहू ः गहू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १२७५७८ हेक्टर, तर प्रत्यक्षात १४३४९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरी ११२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बहुतांश भागात पीक दाणे भरण्याच्या व काही ठिकाणी दाणे पक्वतेच्या अवस्थेत आहे. 

हरभरा ः हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ५१६१४० हेक्टर, तर प्रत्यक्षात १०४२८११ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या २०२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे पीक सध्या पक्व होण्याच्या अवस्थेत आहे.

मका ः मका पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र २२०३५ हेक्टर आहे. १७३६६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरीच्या ७९ टक्के पेरणी झाली आहे. पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला.

करडई ः लातूर विभागात करडई पिकाचे सरासरी क्षेत्र ३६१६७ हेक्टर आहे. प्रत्यक्षात १३७२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT