शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन  झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : हसन मुश्रीफ The last project victims will not recover unless rehabilitated: Hasan Mushrif
शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन  झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : हसन मुश्रीफ The last project victims will not recover unless rehabilitated: Hasan Mushrif 
मुख्य बातम्या

शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : हसन मुश्रीफ

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जमीन सपाटीकरणाबाबत जलसंपदामंत्री यांच्याकडे लवकरच बैठक घेतली जाईल. शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. 

आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, भूसंपादन अधिकारी हेमंत निकम आदी उपस्थित होते. 

मुश्रीफ म्हणाले, ‘‘मागील बैठकीत सांगितल्यानुसार प्रश्ननिहाय अर्ज देण्यास सांगितले होते. यामध्ये ४१ अर्ज आले होते. सकारात्मक दृष्टिकोनातून ९५ टक्के अर्ज मान्य केले आहेत. एकूण ३५९ लोकांना जमीन पॅकेज वाटप केले आहे. ३० लोकांना अंशत: जमीन वाटप केले आहे. एकूण ५० कोटींचे वाटप झालेले आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांसाठी बुधवार हा दिवस प्रातांधिकाऱ्यांनी दिला आहे. आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी दर बुधवारी प्रांताधिकारी वेळ देणार आहेत. ३३ हेक्टर जमिनीबाबत स्थगिती आहे ती उठल्यानंतर वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल.’’ 

निर्वाह भत्ता ६५ टक्के रक्कमेवरील व्याज या बाबत आठ दिवसांत कार्यवाही होईल. जमीन सपाटीकरणाबाबत जलसंपदा मंत्री यांच्याकडे बैठक लावली जाईल, तसेच मदत व पुनर्वसनाबाबतही शासन स्तरावर बैठक घेतली जाईल, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले. 

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ‘‘जमीन किंवा स्वेच्छा पुनर्वसन यापैकी एक फायदा घ्यावा, दोन्ही घेऊ नये. जमिनीबाबतच्या वहिवाटीचा अडथळा निश्चितपणे दूर केला जाईल. त्या प्रकल्पग्रस्तांना उच्च न्यायालयाने पाठवलेल्या प्रकरणांबाबत तपासून निर्णय घेतला जाईल.’’ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याबाबत निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेतला जाईल. 

प्रांताधिकारी श्रीमती पांगारकर यांनी यावेळी आलेल्या ४१ अर्जांबाबत आढावा दिला. पाणीसाठा आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र जत तालुक्‍याच्या पूर्व भागात काही प्रमाणात पाणीटंचाई जाणवू लागली असल्याचे चित्र आहे. जत तालुक्‍यात महिन्यापूर्वी ५९ टक्के पाणीसाठा होता. तर अवघ्या पंधरा दिवसांत २० टक्‍क्‍यांनी पाणीसाठा कमी झाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT