Lampy skin infection in animals 
मुख्य बातम्या

जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग

नांदेड ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी गोवंशीय जनावरांना ‘लंपी स्किन’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग झाला आहे.

टीम अॅग्रोवन

नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी गोवंशीय जनावरांना ‘लंपी स्किन’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग झाला आहे. या आजारावरील उपचारांसाठी पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये पुरेशा प्रमाणात औषधे, गोळ्या उपलब्ध करुन द्याव्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

गेल्या पंधरा दिवसांपासून अर्धापूर परिसरातील शेतकऱ्यांकडील गाई तसेच बैलांच्या अंगावर मोठ्या आकाराच्या गाठी येत आहेत. अंग सुजत आहे.अंगात ताप भरल्याने जनावरे वैरण खात नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या ठिकाणाच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा उपलब्ध करावा, अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर माटे यांनी केली. 

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता उके म्हणाल्या, ‘‘सध्या बाधित जनावरांवर उपचार केले जात आहेत. हा आजार बरे होण्यासाठी किमान दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो. शेतकऱ्यांनी आजारी जनावरांना पशुचिकित्सालयात उपचारासाठी आणावे’’ 

पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय म्हणाले, ‘‘‘लंपी स्किन’ आजार विषाणूजन्य आहे. निरोगी जनावरांना संसर्ग होऊ, यासाठी आजारी जनावर विलगीकरणात ठेऊन उपचार करावे.`` 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT