लाखगंगात आंदोलन सुरूच; तिसऱ्या दिवशीही फुकट दूधवाटप
लाखगंगात आंदोलन सुरूच; तिसऱ्या दिवशीही फुकट दूधवाटप 
मुख्य बातम्या

लाखगंगात आंदोलन सुरूच; तिसऱ्या दिवशीही फुकट दूधवाटप

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : जोपर्यंत जाहीर केलेला हमीदर मिळत नाही, तोपर्यंत संकलन केंद्रावर घातलेल्या दुधाच्या स्लिप न घेण्याचे धोरण लाखगंगासह अनेक गावांतील दूध उत्पादकांनी कायम ठेवले आहे. तिसऱ्या दिवशीही मोफत दूधवाटप आंदोलन सुरूच होते.  औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा गावाने घसरलेल्या दूधदराच्या प्रश्नावर आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे. जाहीर केलेला २७ रुपये प्रतिलिटरचा हमीदर मिळत नाही, तोपर्यंत दूध फुकट वाटण्यासह संकलन केंद्रात घातलेल्या दुधाच्या पावत्या किंवा पैसे न स्वीकारण्याचा निर्णय घेतला अाहे. लाखगंगा येथील दूध संकलन शुक्रवारी (ता. ४) जवळपास १७०० ने घटून २८०० वर आले होते. शनिवारी (ता. ५) हे संकलन २ हजार लिटरने घटून २५०० वर अल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली. टप्प्याटप्प्याने दूध उत्पादक प्रशासकीय कार्यालयावर जाऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोफत दूधवाटपाचे काम करीत असून, सोमवारी (ता. ७) वैजापूर तालुक्‍यातील काही गावचे दूध उत्पादक तहसील कार्यालय व इतर प्रशासकीय कार्यालयांत मोफत दूधवाटप करणार असल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली. 

सरकारने आतातरी जागं व्हावं... दूध उत्पादक सहकाऱ्यांची चिंता मलाही त्रास देतेय. माझ्याकडे चार गायी होत्या. त्यापैकी तीन मी दुधाला मिळणारे दर खर्चाला परवडत नसल्याने विकल्या. केवळ दरापायी शेतीसाठी सर्वांत जास्त फायद्याचा पूरक उद्योग हातचा गेला. अनेकांच्या दावणी रिकाम्या होत आहेत. मायबाप सरकारनं आता तरी जागं व्हावं, अशी भावना लाखगंगा येथील सूर्यकांत चांदगुडे यांनी व्यक्‍त केली.  गावात जवळपास २९० दुभतं गोधन. त्यामधील २० ते २५ दुभती जनावरं अलीकडे दोन महिन्यांत विकली गेली, विकणं सुरूच आहे. दोन महिन्यांत अडीचशे लिटरने दूध उत्पादन घटलं. नव्याने शेतीपूरक उद्योग म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळलेला गावातील तरुण निराशेच्या गर्तेत सापडला आहे. शासनाने तत्काळ दूध दरावर उत्पादकांना धीर देणारा निर्णय न घेतल्यास कुणीही पूरक उद्योग करण्यास धजावणार नाही.  - संदीप बारसे, दूध उत्पादक, वीरगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

SCROLL FOR NEXT