लाखगंगात दूध संकलन घटले
लाखगंगात दूध संकलन घटले 
मुख्य बातम्या

लाखगंगात दूध संकलन घटले

वृत्तसेवा

औरंगाबाद : दूध उत्पादकांनी मोफत दूधवाटप केल्याने लाखगंगा येथील दूध संकलन जवळपास निम्म्यावर आले आहे. शिवाय दूध घातले तरी हमीदर मिळत नाही, तोवर स्लिप न घेण्याची भूमिका दूध घालणाऱ्या दूध उत्पादकांनी  घेतल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली.  लाखगंगा येथे जवळपास चार ते साडेचार हजार लिटर दूध संकलन केले जाते. गुरुवारी (ता. ३) लुटता कशाला... फुकटच न्या,   म्हणत आंदोलनाचा शंखनाद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही (ता. ४) लाखगंगा येथे फुकट दूधवाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. सकाळपासूनच ग्रामदैवत मारोतीच्या मंदिरासमोर ठरल्याप्रमाणे भजनाला सुरवात करण्यात आली. त्यानंतर गावातील दूध उत्पादकांनी मंदिरासमोर दूध घोटून त्याचे मोफत वाटप केले.  

लाखगंगा येथे दरदिवशी साडेचार हजार लिटर दूध संकलन केले जाते. शुक्रवारी (ता. ४) केवळ २८०० लिटर दुधाचे संकलन झाले. जवळपास १७०० लिटरने एकट्या लाखगंगा गावातील दूध संकलन घटले.   पंचक्रोशीतील लाडगाव, बापतारा, बाभूळगाव, लाखगंगा, पुरणगाव, वीरगाव आदी गावांमध्येही दूध उत्पादकांनी मोफत दूधवाटपाचा कार्यक्रम राबविल्याने त्या गावांमधीलही दूध संकलन मोठ्या प्रमाणात घटले. शिवाय तेथील दूध उत्पादकांनीही आपल्या दुधाच्या स्लिप घेतल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. जोवर दूध उत्पादकांना शासनाने ठरवून दिलेला २७ रुपये प्रतिलिटरचा हमीदर दिला जात नाही. तोवर आंदोलन तसेच ९ मेपर्यंत दररोज मोफत दूधवाटपाचा कार्यक्रम सुरूच राहणार असल्याची भूमिका दूध उत्पादकांनी घेतली आहे. शनिवारी (ता. ५) लाखगंगा, लाडगाव, सावखेड गंगा आदी गावांतील दूध उत्पादकांसह वैजापूरच्या तहसील कार्यालयावर जाऊन मोफत दूधवाटप करण्याची तयारी चालविली असल्याची माहिती लाखगंगाचे सरपंच दिगंबर तुरकने यांनी दिली. डोणगाव येथील दूध उत्पादकांनीही शुक्रवारी घातलेल्या दुधाच्या स्लिप घेतल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दूध उत्पादक फुकट वाटतोय म्हणजे त्याच्याकडे दूध शिल्लक आहे असे नाही. यामागील दूध उत्पादक शेतकऱ्यांची भावना सरकारने समजून घ्यावी. अंत न पाहता दूध उत्पादकाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी. - धनंजय धोर्डे, दूध उत्पादक तथा शेतकरी नेते.  ..... आठ दिवसांपूर्वी ५० हजाराला एक गाय बाजारातून आणली होती. एकीच्या दोन गायी झाल्यानं दहा-वीस लिटर दूध निघंल व कुटुंबाचा रहाटगाडा भागल असं वाटलं. विकत आणलेल्या गायीचा मृत्यू झाल्यानं साऱ्या अपेक्षांवर स्वप्नांवर पाणी फेरलं. गायही गेली अन्‌ पैसेही गेल्यानं आर्थिक संकट आलं.  - नंदू तुरकने, दूध उत्पादक, लाखगंगा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद.  .....

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT