‘ला-निना’ स्थिती यंदाच्या मान्सूनसाठी उपयुक्त ः डाॅ. पै
‘ला-निना’ स्थिती यंदाच्या मान्सूनसाठी उपयुक्त ः डाॅ. पै 
मुख्य बातम्या

‘ला-निना’ स्थिती यंदाच्या मान्सूनसाठी उपयुक्त ः डाॅ. पै

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली : प्रशांत महासागरातील ‘ला-निना’ स्थितीची तीव्रता कमी होत असल्याचे जागतिक हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मात्र ही स्थिती मे महिन्यापर्यंत कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ‘‘नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मान्सून) पोषक ठरणारी ला-निना स्थिती जून महिन्यापासून निवळण्यास सुरवात होणार अाहे. यंदाच्या मान्सूनच्या पावसासाठी ‘ला-निना’ उपयुक्त ठरणार आहे, असे मत भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन हवामान अंदाज विभागाचे संचालक डाॅ. डी. एस. पै यांनी दिली.      प्रशांत महासागराच्या पूर्व-मध्य भागात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरसरीपेक्षा कमी असल्यास त्या स्थितीला ‘ला-निना’ म्हटले जाते. ही स्थिती भारतात चांगला पाऊस पडण्यास पोषक ठरते. तर प्रशांत महासागरातील विषुववृत्तीय भागात समुद्र पृष्ठभागाचे तापमान वाढल्यास ‘एल निनो’ स्थिती असते. त्यामुळे मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. गेल्या वर्षी भारतात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९५ टक्के पाऊस पडला होता. हवामान विभागाच्या संज्ञेनुसार ९६ ते १०४ टक्के पाऊस सरसरी इतका, ९० ते ९६ टक्के पाऊस सरासरीपेक्षा कमी, तर ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस सरासरीपेक्षाा अपुरा मानला जातो. देशातील वार्षिक पावसाच्या ८० टक्के पाऊस मान्सूनमध्ये पडतो. पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी हा पाऊस परिणामकारक ठरतो. समुद्र आणि वातावरणातील मापदंडानुसार ला-निना स्थिती संपुष्टात आली आहे. सध्या सर्वसाधारण स्थितीत असणारे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान डिसेंबर महिन्यापर्यंत हळूहळू वाढत जाणार असल्याचे अहवाल आॅस्ट्रेलियातील हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय हवामान संशोधन संस्थेने जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये एल निनो तयार होण्याची शक्यता २४ ते ३१ टक्के, तर स्थिती सर्वसाधारण राहण्याची ५३ ते ६१ टक्के शक्यता असल्याचे मागील आठवड्यात म्हटले आहे. तसेच जुलै महिन्यानंतर सर्वसाधारण स्थिती नाहीशी होऊन एल निनो स्थिती वाढत जाणार असल्याचे या अमेरिकन संस्थेने स्पष्ट केले आहे. आॅस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील हवामान संस्थांनी ‘ला-निना’बाबत व्यक्त केलेली शक्यता भारतीय हवामान विभागाने फेटाळली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT