‘झिरो बजेट’ शेती तंत्राचा ‘केव्हीके’ करणार प्रसार 
मुख्य बातम्या

‘झिरो बजेट’ शेती तंत्राचा ‘केव्हीके’ करणार प्रसार

शून्य खर्चावर आधारित शेतीचा प्रसार करण्याच्या मोहिमेत आता देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांना (केव्हीके) सामावून घेण्यात आले आहे.शून्य खर्चाच्या शेतीची संकल्पना प्रत्यक्ष बांधावर नेण्याच्या सूचना केंद्र सरकारने या पूर्वीच दिलेल्या होत्या.

टीम अॅग्रोवन

पुणे ः शून्य खर्चावर आधारित शेतीचा प्रसार करण्याच्या मोहिमेत आता देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांना (केव्हीके) सामावून घेण्यात आले आहे. शून्य खर्चाच्या शेतीची संकल्पना प्रत्यक्ष बांधावर नेण्याच्या सूचना केंद्र सरकारने या पूर्वीच दिलेल्या होत्या. त्यानुसार, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) सहायक महासंचालक एस. पी. किमोठी यांनी अलीकडेच सर्व कृषी विद्यापीठांमधील कुलगुरूंना पत्र पाठवले आहे. शून्य खर्चावर आधारित शेतीचा प्रसार करण्याची जबाबदारी केव्हीकेकडे द्यावी, असे आदेश या पत्राच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. शेतीमधील कोणत्याही शास्त्रीय व्यवस्थेबाबत प्रयोग, पडताळणी आणि शिफारशीची जबाबदारी परिषदेकडे आहे. हजारो कृषी शास्त्रज्ञ, भरपूर निधी परिषदेकडे आहे. त्यामुळे शून्य खर्चावर आधारित शेतीवर प्रयोग झाल्यास नेमक्या शिफारशी तयार होण्याची शक्यता आहे.  शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिक शेतीवर किंवा शून्य खर्चावर आधारित शेतीबाबत गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू आहे. मात्र परिपूर्ण संशोधन परिषदेकडून झालेले नाही. देशभर आता प्रयोग आणि प्रात्यक्षिके झाल्यास आगामी काळात या तंत्राचा सहज अवलंब करणारे प्रारूप शेतकऱ्यांसमोर येऊ शकते.  

अभ्यासक्रमही तयार होणार ‘‘शून्य खर्चावर आधारित शेती करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे, अशी चर्चा केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत झालेली आहे. या बाबत कॅबिनेट सचिवाने कृषी परिषदेला पत्र पाठविले आहे. शून्य खर्चावर आधारित शेतीचा प्रसार करण्यासाठी  प्रात्यक्षिके घेण्याच्या सूचना केव्हीकेला द्याव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा मुद्दा गुजरातमधील परिषदेत मांडलेला आहे. त्यामुळे आता शून्य खर्चावर आधारित शेती करण्यासाठी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील तयार करावा लागेल,’’ असेही कृषी परिषदेने विद्यापीठांना कळविले आहे.

संशोधनाला चालना मिळेल शून्य खर्चावर आधारित शेती करण्यासाठी संशोधन, प्रात्यक्षिके व प्रशिक्षण आयोजित करण्याचे बंधन देशातील सर्व संशोधन केंद्रांवर टाकावे, असा आग्रह देखील कृषी परिषदेने धरलेला आहे. संशोधनासाठी केव्हीके व सरकारी कृषी संशोधन केंद्रांच्या जागा वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT