कृष्णा नदी पाणी  
मुख्य बातम्या

‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणी

आमदार अनिल बाबर व तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे व ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने आज दिघंची गावाला टेंभूचे पाणी मिळाले. आजचा हा गावच्या दृष्टीने ऐतिहासिक दिवस आहे. - अमोल मोरे, सरपंच, दिघंची

टीम अॅग्रोवन

दिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न वाटणारी कृष्णामाई दिघंची गावच्या अंगणी आली व निंबाळकर तलावात अवतरली. ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आल्याने फटाक्‍यांची आतषबाजी करून, पेढे व मिठाई सरपंच अमोल मोरे यांना भरवित जल्लोषात स्वागत केले.  चातकासारखी कृष्णेच्या पाण्याची ग्रामस्थ वाट पाहत होते. कुरुदवाडीपासून १९ एप्रिलला पाणी सोडण्यात आले होते. तेथून डाव्या कालव्याद्वारे बंद पाइपमधून व पुढे ओढे, बंधारे भरत तब्बल एक महिन्याने वाट करून जणू अडथळ्यांची शर्यत पार करीत गावच्या अंगणी आली आहे. दिघंची गावाला असणारी भारत निर्माण पाणीपुरवठा योजना ही योजना ही महाडिकवाडी तलावावर तर जुनी निंबाळकर तलावावर आहे. परिसारत पाऊसच न झाल्याने दोन्ही तलाव कोरडे ठणठणीत आहेत. येथील असणारे विहिरीचे स्रोत पूर्णपणे संपुष्टात आल्याने पाणी योजना कोलमडून पडली. गावाला पाणीपुरवठा करणे अश्‍यक्‍य होऊ लागले.  सध्या वीस हजार लोकसंख्या असणारे गाव व वाड्यावस्त्या टॅंकरवर अवलंबून आहेत. गावचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळित होऊन बारा ते तेरा दिवसांतून पाणी मिळत होते. मात्र या सर्व पाणीप्रश्नावर येणारे टेंभू पाणी हाच आशेचा किरण होता. गावाला पाणी तातडीने येण्यासाठी व शेतीला कोणी वापर करू नये म्हणून प्रशासनाबरोबर सरपंच अमोल मोरे यांनी गावातील युवकांची कुमक तयार केली. रात्री तीन ते चार वॉलच्या ठिकाणी हे युवक रात्रीचा ठेवून आहेत. तर ओढा व बंधारा पत्रात झाडे झुडपे काढण्यासाठी व अडचणीच्या ठिकाणी पाण्याला वाट करून देण्यासठी जेसीबी मशिनची मदत घेतली.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gokul Milk Union Election: गोकुळ दूध संघासाठी आज मतदान

Agricultural Export Opportunities: शेतकऱ्यांना निर्यात संधी उपलब्ध करून देणार: पणनमंत्री रावल

Gokul Election Voting: 'गोकुळ'साठी आज ३५ केंद्रांवर मतदान, चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारणार?

Soybean Arrival: बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढू लागली

Land Acquisition Rule: भूसंपादन नसल्यास टेंडरही नाही

SCROLL FOR NEXT