कृषिक प्रदर्शन  
मुख्य बातम्या

कृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे प्रारंभ

टीम अॅग्रोवन

बारामती, जि. पुणे  : येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेले कृषिक हे शेती प्रात्यक्षिकांवरील कृषी प्रदर्शन गुरुवारपासून (ता.१७) सुरू होत आहे. 

कृषिक प्रदर्शनाचे उद्‍घाटन गुरुवारी (ता. १७) इक्रिसॅटचे महासंचालक डॉ. पीटर कार्बेरी, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, टाटा ट्रस्टचे श्री. वेंकटरमन, कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. मोहंमद आरिज अहमद, मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विदळे, अटारीचे संचालक डॉ. लाखनसिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे.

हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. २०) सुरू राहणार आहे. प्रदर्शनासाठी ११० एकर क्षेत्रावर शेतीतील फळे, फुले, भाजीपाला पिकांच्या विविध नव्या जाती, नवी खते, नव्या तंत्रज्ञानाने युक्त लागवड व पाणी व्यवस्थापन पद्धतींची जवळपास १५० प्रात्यक्षिके असून देश-विदेशातील विविध २२५ हून अधिक कंपन्या त्यांच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी उपलब्ध असणार आहेत.

या प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती केव्हीकेचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली व या प्रदर्शनाचे व्यवस्थापन करणाऱ्या पॅंटम संस्थेचे संचालक हर्षवर्धन पानसरे व वैभव तांबे यांनी दिली. प्रदर्शनासाठी शारदानगर येथे प्रदर्शन स्थळासमोर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, मागील दोन वर्षे होत असलेल्या गर्दीमुळे ही सुटसुटीत व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.   दीड टनाचा ‘कमांडर’ आणि इतरही प्रदर्शनात या वर्षी जातिवंत जनावरांचेही प्रदर्शन होणार आहे. यामध्ये अगदी दीड टन वजनाच्या कमांडर रेड्यापासून ते श्वान, अश्व, गायी-म्हशींच्या विविध देखण्या जाती शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT