संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कोल्हापूर बाजार समिती करणार बीओटी तत्त्वावर शीतगृह उभारणी

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : कोल्हापूर बाजारसमितीला स्वत: शीतगृह बांधणे शक्‍य नसल्याने अखेर समितीने शीतगृह भाडेतत्त्वावर बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. खासगी व्यक्तींना तीस वर्षे भाडेतत्त्वावर यासाठी जागा देण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागविल्या असल्या तरी फक्त दहा टक्के शेतमाल असावा इतकीच मर्यादा बाजार समितीने घातल्याने याविरोधात शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

बाजार समितीला शक्‍य असतानाही स्वत: न बांधता ती बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर खासगी लोकांना देत आहे. यातही व्यापारी हिताचा विचार स्पष्टपणे दिसून येत असल्याचे समितीच्याच काही संचालकांचे मत आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतमालालाच प्राधान्य देणे अपेक्षित असताना केवळ दहा टक्केच शेतमालाची अट घातल्याने शीतगृहाचा फायदा कोणाला असा प्रश्‍न आहे. निविदा स्वीकारण्यास सुरवात

विशेष करून गुळासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीत शीतगृह व्हावे म्हणून विविध पातळीवरून प्रयत्न झाले. पण राजकीय इच्छाशक्ती कोणाचीही नसल्याने तज्ज्ञांनी पहाणी करूनही हे काम रेंगाळले. पण सध्याची एकूण स्थिती पहाता बाजार समितीला स्वत: शीतगृह बांधणे शक्‍य नसल्याने बाजार समितीतच खासगी तत्त्वावर शीतगृह बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी नुकत्याच निविदा मागविण्यास सुरवात झाली आहे. आवारातील सतरा हजार चौरस फूट जागेत तीन हजार टन क्षमतेचे कोल्डस्टोअरेज बांधण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

फायदा शेतकऱ्यांचा की व्यापाऱ्यांचा? तीस वर्षांच्या भाड्यावर कोणीही या परिसरात शीतगृह बांधू शकणार आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नापेक्षा संबंधितांसाठीच अटी शिथिल केल्या आहेत. बाजारसमितीत जर शीतगृह असेल तर इतर भागातूनही तो व्यक्ती सुमारे नव्वद टक्के इतर भागातील शेतमाल शीतगृहात ठेवू शकतो. पण समजा स्थानिक भागातील शेतकऱ्याने जादा भाडेतत्त्वावर शीतगृहात ठेवायचे ठरविले तर केवळ दहा टक्केची अट दाखवून संबंधित शीतगृह मालक त्याला निरुत्तर करू शकतो. यात शेतकरी हित किती साधणार हाही प्रश्‍न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT