‘जंतर-मंतर’वर होणार ‘किसान संसद’  'Kisan Parliament' to be held on 'Jantar Mantar'
‘जंतर-मंतर’वर होणार ‘किसान संसद’  'Kisan Parliament' to be held on 'Jantar Mantar' 
मुख्य बातम्या

‘जंतर-मंतर’वर आजपासून होणार ‘किसान संसद’ 

टीम अॅग्रोवन

 नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचा निषेध म्हणून आणि हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आजपासून (गुरुवारी) जंतर-मंतर येथे ‘किसान संसदे’चे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी दिली आहे. बुधवारी (ता. २१) या बाबत शेतकरी नेते आणि दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. दर दिवशी सुमारे २०० शेतकरी यात सहभागी होतील, अशी माहितीही देण्यात आली.  बलबीरसिंग राजेवाल म्हणाले, ‘‘किसान संसदेबाबत बुधवारी बैठक झाली. आमची भूमिका आम्ही मांडली, प्रशासनाशी झालेल्या चर्चेनुसार दर दिवशी २०० शेतकऱ्यांचा गट जंतर-मंतर येथे जाईल. या बाबत आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच काही सांगू शकत नाही.’’ शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले, ‘‘शेतकरी युनियनचे नेते आणि दिल्ली पोलिसांशी झालेली चर्चा अर्थपूर्ण आणि सकारात्मक झाली. आज २०० शेतकऱ्यांचा एक गट जंतर-मंतर येथे जाईल. आणि किसान संसद सुरू होईल. ही किसान संसद अंत्यत शांततेत होईल.  राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष शिवकुमार काक्का म्हणाले, ‘‘मागील सात वर्षांत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात घेतलेल्या सर्व निर्णयांवर किसान संसदेत चर्चा होईल. दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत २०० शेतकरी शेतकरी विरोधी निर्णयांवर चर्चा करतील. प्रत्येक शेतकरी संघटना दररोज नव्या पाच शेतकऱ्यांना येथे पाठवेल. त्यांच्याकडे ओळखपत्र, आधार कार्ड असेल. हे सर्वजण पाच बसमधून जंतर-मंतर येथे येथील.’’ 

संसदेला घेराव घालणार नाही 

दिल्ली पोलिसांनी रविवारी होणाऱ्या निदर्शनांना परवानगी नाकारल्यानंतर बलबीरसिंग राजेवाल म्हणाले, ‘‘आज संसदेला घालण्यात येणारा नियोजित घेराव घातला जाणार नाही.’’ शेतकरी दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी २६ नोव्हेंबर २०२० पासून निदर्शने करीत आहेत. दरम्यान, सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही अद्याप मतभेद मिटलेले नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT