दीर्घ खंडामुळे नांदेड, परभणी, हिंगोलीत खरीप धोक्यात
दीर्घ खंडामुळे नांदेड, परभणी, हिंगोलीत खरीप धोक्यात 
मुख्य बातम्या

दीर्घ खंडामुळे नांदेड, परभणी, हिंगोलीत खरीप धोक्यात

टीम अॅग्रोवन

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे (ड्रायस्पेल) संवेदनशील अवस्थेतील खरीप पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. कडक उन्ह पडत असल्यामुळे उभी पिके होरपळून जात आहेत. मूग, उडदा पाठोपाठ सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी आदी पिकांच्या उताऱ्यात मोठी घट येणार आहे.

पावसाचा खंड काळ वाढत चालल्याने खरीप हंगामावर संक्रात आली आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी गतवर्षीप्रमाणेच यंदाही संकटाच्या फेऱ्यात सापडले आहेत.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा कपाशी ऐवजी सोयाबीनला प्राधान्य दिले. या तीन जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा सर्वसाधारण क्षेत्राच्या दीड पटीहून अधिक वाढला. सोयाबीनचे पीक वाढीच्या अवस्थेत असतांना जुलै-आॅगस्टमध्ये पडलेल्या दीर्घ खंडामुळे पाण्याचा ताण बसला. 

गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेंगात दाणे भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीनचे पीक होरपळून गेले. पाते, फुले, बोंडे भरण्याच्या अवस्थेतील कपाशीचे पीक अजून काही काळ तग धरील; परंतु बोंडे परिपक्व होण्यासाठी पाणी नसल्याने उत्पादन घटणार आहेत. या तीन जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पिकांना पाण्याचा ताण बसला आहे.

आमच्या भागात सुरवातीपासूनच कमी पाऊस आहे. पाऊस गायब झाल्याने सोयाबीन, कापूस वाळून गेले आहे. काही दिवसांपूर्वी पाऊस आला होता. परंतु, त्याने झाडाखालची जमीनदेखील भिजली नाही. यंदा सर्वच पिकांच्या उताऱ्यात ५० टक्क्यांहून जास्त घट येणार आहे. - सदाशिव पाटील,  शेतकरी, हणेगांव, ता. देगलूर, जि. नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT