Keep the cowshed clean to control 'Lumpy Skin': Dr. Kaluse 
मुख्य बातम्या

‘लंम्पी स्किन’च्या नियंत्रणासाठी गोठा स्वच्छ ठेवा : डॉ.काळूसे

नाशिक : जनावरांमधील लंम्पी आजाराचा प्रभाव कमी करण्यासाठी या विषाणूजन्य त्वचारोगाच्या लक्षण व उपचाराबरोबरच प्रतिबंधात्मक उपचार म्हणून गोठा नेहमी स्वच्छ ठेवा.

टीम अॅग्रोवन

नाशिक : जनावरांमधील लंम्पी आजाराचा प्रभाव कमी करण्यासाठी ताप कमी करण्याची औषधे, अ व ई जीवनसत्व, जखमेवरील मलम इत्यादींचा वापर करावा. जनावरास मऊ व हिरवा चारा, भरपूर पाणी द्यावे. या विषाणूजन्य त्वचारोगाच्या लक्षण व उपचाराबरोबरच प्रतिबंधात्मक उपचार म्हणून गोठा नेहमी स्वच्छ ठेवा, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र, बुलडाण्याचे पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विषय विशेषज्ञ डॉ. गणेश काळूसे यांनी दिला.

के. के. वाघ कृषी महाविद्यालयातर्फे ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिकता कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत ''जनावरातील लंम्पी त्वचारोगाविषयी काळजी व उपचार नियंत्रण'' या विषयावर मार्गदर्शनसाठी ऑनलाइन शेतकरी मेळावा घेण्यात आला. 

डॉ. काळूसे म्हणाले, ‘‘निरोगी जनावरांच्या गोठ्यात डास, गोचीड, माश्या यांसारख्या किटकांची संख्या कमी करण्यासाठी वेळोवेळी औषधांची फवारणी करावी.  हा त्वचारोग विषाणूमुळे होतो. या आजारात जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. निमोनिया व श्वसन संस्थचे लक्षणे दिसतात. बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. गाई व म्हशीमधील सर्व वयाच्या जनावरांना हा त्वचारोग होऊ शकतो.’’  

‘‘आजाराचा प्रसार कीटकांमार्फत तसेच बाधित जनावराच्या त्वचेवरील व्रण, नाकातील स्राव, दुध, स्पर्शाद्वारे होऊ शकतो. यासाठी बाधित जनावराना वेगळे ठेवावे. या आजारात बाधित जनावरे अशक्त होतात, दुध क्षमता व प्रजनन क्षमतेवर ही परिणाम होतो,’’ असेही काळूसे म्हणाले.  

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिशकुमार हाडॊळे आदींचे मार्गदर्शन लाभले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Devendra Fadnavis: 'शेतकऱ्यांचे दुःख मोठे, ५ हजारांची मदत मोठी नाही, पण...'; मुख्यमंत्री फडणवीस असे का म्हणाले?

Diwali Financial Aid : ‘पाच हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा; मगच मदत द्या’

Farmers Protest: शेतीसाठी १७ वर्षांपासून लढा

Women In Agriculture : महिला शेतकरी दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Farmer Certificate: शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीचा पेच

SCROLL FOR NEXT