जोतिबा यात्रा
जोतिबा यात्रा  
मुख्य बातम्या

जोतिबा यात्रेस प्रारंभ; शुक्रवारी मुख्य दिवस

टीम अॅग्रोवन

जोतिबा डोंगर जि. कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवारी (ता. १९) असून कामदा एकादशीच्या मुहूर्तावर सोमवारी (ता. १५) यात्रेस प्रारंभ झाला. कामदा एकादशीस यात्रा सुरू करण्याची पारंपरिक पद्धत आहे. बेळगाव भागातील काही भाविक पायी आले, तर बैलगाड्या घेऊन आलेले चव्हाटा गल्ली, नार्वेकर गल्लीतील भाविक उद्या डोंगर चढतील. यंदा कामदा व भागवत या दोन एकादशी आल्यामुळे भाविकांत संभ्रम आहे. त्यामुळे यंदा काही भाविकांनी भागवत एकादशी धरली आहे. त्यामुळे डोंगरावर काही भाविकांचे ताफे आले.  सकाळी आलेल्या भाविकांचे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यांना विडा देण्यात आला, तर जोतिबाच्या मूर्तीची पंचारतीने ओवाळणी करण्यात आली. डोंगरावर सोलापूर, वरवंटी, आंबेजोगाई, बीड भागांतील भाविक दाखल झाले. उद्याही पालखी व सासनकाठीसह या भागातील इतर भाविक दाखल होणार असल्याचे बीडच्या भाविकांनी सांगितले. हलगी, पिपाणी, सनई व व्हलेर बाजा या वाद्यांच्या तालावर मंदिर परिसरात सासनकाठ्या नाचवण्यात आल्या. मुख्य मंदिराभोवती प्रदक्षिणा काढून भाविकांनी गुलाल, खोबऱ्याची उधळण केली. बेळगावच्या भाविकांनी मंदिर परिसरात ढोल व  कैताळ या वाद्यावर नृत्य करून चांगभलंचा जयघोष केला. कामदा एकादशीनिमित्त श्री जोतिबा देवाची विठ्ठल रूपातील सालंकृत पूजा बांधली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

SCROLL FOR NEXT