संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश

ज्ञानेश उगले

नाशिक : कर्जमाफीचा उडालेला गोंधळ, त्यातच अवकाळी पावसाने पिकांचे झालेले नुकसान यामुळे शेतकरी चिंताक्रांत असताना पीक पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.

मात्र ऑक्टोबर उलटल्यानंतर शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यात अवकाळी पावसाने सुमारे ५० हजार शेतकऱ्यांना फटका बसला असून, २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. यंदा जूनपासूनच जिल्ह्यात वरुणराजाने कृपादृष्टी करत जिल्ह्याला चांगलेच झोडपले.

चांगल्या पावसामुळे यंदा चांगले उत्पादन होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांंच्या चेहऱ्यावर हसू फुलले. परंतु परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. जिल्ह्यातील ६६२ गावांतील ४८ हजार ९८४ शेतकऱ्यांचे अवकाळीने नुकसान झाले. जिरायत क्षेत्रातील भात, नागली, वरई, बाजारी, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, मका या पिकांचे १२ हजार ८८८.५५ हेक्टर तर बागायती क्षेत्रातील कांदा, ऊस व भाजीपाला या पिकांचे २६३९.६४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.

फळपीक क्षेत्रातील द्राक्ष पिकाला मात्र सर्वाधिक फटका बसला. ऐन छाटणीच्या व झाडाने फूल धरण्याच्या काळातच बेमोसमी पाऊस झाल्याने झाडांची फुले गळून पडली. तर हाती आलेला कांदा भुईसपाट झाला. १० हजार २७४ हेक्टरवरील द्राक्षांचे नुकसान झाले आहे.

कृषी विभागाने प्राथमिक पातळीवर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मात्र, शासनाकडून कोणतेही निर्देश नसल्याने पीक पंचनामे करण्यात आले नव्हते. ऑक्टोबर महिना संपत आल्यानंतर शासनाने पंचनाम्याचे आदेश दिल्याने आता यंत्रणा कामाला लागणार आहे.

पंचनाम्याबाबत संभ्रम शासन निर्देशानुसार ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्यात येतात. मात्र, सरसकट पंचनामे करण्याची मागणी होत आहे. त्यातही आता ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांनाच नुकसानभरपाई मिळणार आहे. त्यामुळे किती शेतकरी नुकसानभरपाईस पात्र ठरणार याबाबतही संभ्रमच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT