Inter-crop registration in e-crop survey app 'lost' 
मुख्य बातम्या

ई-पीक पाहणी ॲपमध्ये आंतरपीक नोंदणीला ‘खो’

शासनाच्या ई-पीक पाहणी कार्यक्रमात शेतातील मुख्य पिकात असलेल्या आंतरपिकांची नोंद अ‍ॅपमध्ये होत नसल्याने शेतकरी त्रासले आहेत.

टीम अॅग्रोवन

पथ्रोट, जि. अमरावती : शासनाच्या ई-पीक पाहणी कार्यक्रमात शेतातील मुख्य पिकात असलेल्या आंतरपिकांची नोंद अ‍ॅपमध्ये होत नसल्याने शेतकरी त्रासले आहेत. 

पथ्रोट परिसरात ८० टक्के क्षेत्रफळावर संत्रा बागा आहेत. त्यापैकी पन्नास टक्के शेतीमध्ये सोयाबीन, तूर, उडदसारखी शासन खरेदीत अग्रेसर असलेल्या पिकांची आंतरपीक म्हणून शेतकरी सदरचे पीक घेतात. मुख्य पिकासोबत असलेल्या अशा सर्व आंतरपिकांची ते शासनदरबारी खरेदीचा व्यवहार करता यावा, तसेच नुकसान झाल्यास भरपाई मिळावी म्हणून तलाठ्यांमार्फत आपल्या सातबारावर नोंद घेतात. परंतु आता २०२०-२१ करिता खरीप हंगामातील पीकपाहणी पेरा हा १५ सप्टेंबर २०२१ आपण स्वतः मोबाईलच्या साह्याने नोंदवायचा आहे. त्यामुळे शासन आदेशानुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे शेतातील पिकांची नोंद आपणास स्वतः शेतात जाऊन करायची आहे. तसे न केल्यास आपल्या सातबारा उताऱ्यातील पीकपेरा हा कोरा राहील. त्यामुळे आपणास कोणतीही शासकीय मदत बाजार समितीत, पीकविमा, पीककर्ज व अनुदान प्राप्त होणार नाही व लाभ घेता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. 

त्या अनुषंगाने प्रत्येक शेतकऱ्याने आपले मुख्य पीक व आंतरपीक ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये नोंद करणे सुरू केले आहे. परंतु मुख्य पिकातील आंतरपिकांची नोंद ही सदरच्या अ‍ॅपमध्ये होत नसल्याने त्यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र जोपर्यंत त्यांच्या आंतरपिकाची नोंद अ‍ॅपमध्ये होत नाही तोपर्यंत ती नोंद सातबारा पीकपेऱ्यामध्ये घेण्यास तलाठ्यांनीसुद्धा असमर्थता दाखविली असल्याने शेतकरी खूपच वैतागले आहेत. याबाबत तलाठीसुद्धा निरुत्तर झाले आहेत. 

मिश्र पिकांमध्ये आंतरपिकाची नोंद होते ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये मिश्र पिकांमध्ये आंतरपिकाची नोंद होते. त्या अ‍ॅपमध्ये आंतरपिकाची नोंद करून घ्यावी, असे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी सुचविले आहे.

ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये आंतरपिकाची नोंद करण्यासाठी सर्व पर्याय निवडले तरी नोंद होत नाही. तसेच सदरचे अ‍ॅपही व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे आमची खूपच पंचाईत झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन आम्हाला प्रात्यक्षिक द्यावे.  - पवन जगनवार, शेतकरी, पथ्रोट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT