संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा गुरुवारपर्यंत देणार, कंपनीचे आश्वासन

टीम अॅग्रोवन

अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक शेतकऱ्यांनी काढलेल्या फळ पीकविम्याचा लाभ न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १५) येथील कंपनीच्या जिल्हा कार्यालयावर धडक दिली. दुपारपासून रात्री आठ वाजेपर्यंत ठिय्या देत अधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांनी कोंडून घेतले. या प्रश्नावर रात्री तोडगा निघाला असून शेतकऱ्यांना गुरुवारपर्यंत (ता. २१) फळ पीकविम्याचा लाभ दिला जाईल, असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

शहरातील गोरक्षण मार्गावरील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात अकोट तालुक्यातील पणज, रुईखेड आणि बोचरा परिसरातील शेतकऱ्यांनी धडक दिली. विम्याच्या लाभाबाबत जोपर्यंत आश्वासन मिळत नाही, तोवर कार्यालय सोडणार नाही आणि अधिकाऱ्यांनाही जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. जवळपास सात तास ठिय्या दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी एक आठवड्यात दावे निकाली काढणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी शुक्रवारी रात्री ८ वाजता आंदोलन मागे घेतले.

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर पिकांसोबतच फळबागांचेही अतोनात नुकसान झाले. अकोट तालुक्यातील पणज मंडळातील केळी उत्पादकांनीही त्याचा फटका बसला. मागील वर्षात दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. या शेतकऱ्यांनी २०१८-१९ मध्ये फळ पीकविमा काढला होता. उन्हामुळे केळीची पाने सुकली होती. पीकवाढीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. परिणामी, केळी पिकाचे मोठे नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे दावा करून नुकसानभरपाईची मागणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही दिले होते. विम्याची हेक्टरी १ लाख ७६ हजार रुपये मंजूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. काहींना दाव्यापोटी पहिला हप्ता मिळाला. मात्र, नंतर उर्वरित रक्कम मिळालेली नाही. विम्यापासून वंचित राहिलेल्या ३५ शेतकऱ्यांनी शुक्रवारी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. फळ बागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दाव्याची संपूर्ण रक्कम मिळणे अपेक्षित होते. पंचनामे झाल्यानंतर सुमारे तीनशेपेक्षा जास्त शेतकरी विमा रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026 Live : केंद्रीय अर्थमंत्री मांडणार संसदेत अर्थसंकल्प; शेतकऱ्यांना अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

Weeky Weather: राज्यात अंशतः ढगाळ हवामानाची शक्यता

Khajoor Cultivation: देगाव परिसरात खजूर लागवडीचा प्रयोग

Mahabeej: ‘महाबीज’च्या व्यवस्थापकीय संचालकांचे बदलीसत्र सुरूच

Rabi Crops: देशात रब्बी पीक क्षेत्रात १८ लाख हेक्टरने वाढ

SCROLL FOR NEXT