सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक पतंगांचा प्रादुर्भाव 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक पतंगांचा प्रादुर्भाव

आमचा डाळिंब उत्पादक गट आहे. त्या माध्यमातून युरोपला डाळिंबाची निर्यात करतो. परंतू कीटकांचा प्रादुर्भाव झाल्याने त्यावर कीटकनाशकाची फवारणी करणे अवघड झाले आहे. रसशोषक पतंगामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान होत आहे. - विजय मरगळे, डाळिंब उत्पादक, बनपुरी, ता. आटपाडी, जि. सांगली.

टीम अॅग्रोवन

सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या बागेत रसशोषक पतंगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे डाळिंबाचे २० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. सुरवातीच्या काळात पाणीटंचाई असल्याने टॅंकरद्वारे पाणी देऊन बागा जगविल्या. मृग हंगामातील बहार धरला. परंतु पाण्याची कमतरता असल्याने झाडाला फळांची संख्या कमी झाली. त्यातूनही दर्जेदार डाळिंब आणले. गेल्या आठवड्यात दुष्काळी पट्ट्यासह जिल्ह्यात परतीचा पाऊस बरसला. शेतकरी आनंदी झाला. परंतू हा पाऊस डाळिंबासाठी फायद्याचा ठरत असला तरी, रसशोषक पतंगाने त्यावर घाला घातला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मृग हंगामातील डाळिंब फळाचे वजन २०० ते २५० ग्रॅम झाले असून एका महिन्यात डाळिंबाची काढणी होणार आहे. रसशोषक पतंग कीटक दिवसा गवतात लपून बसतो. रात्रीच्या वेळी तो फळावर हल्ला करतो. या कीटकाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी फवारणीचा उपाय करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र दुसरीकडे डाळिंब युरोपला निर्यात होत असल्याने कीटकनाशकांचा वापर करण्यावरही मर्यादा येत आहेत. यामुळे डाळिंब फळाचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. शेतकरी बागेत सापळ्यांचा वापर करूनही किडीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PDKV Garlic Planter: दुष्काळात लसूण लागवडीत बियाण्याची बचत करा; पीडीकेव्हीचे टोकण यंत्र ठरेल फायदेशीर

Fertilizer Subsidy: 'रब्बी'साठी स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या अनुदान रकमेत वाढ; 'डीएपी'ची पिशवी १,३५० रुपयांनाच

Farmer Government Schemes: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळणार, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Agrowon Diwali Article: ‘कृषिगती’चा इलेक्ट्रिक साथी’

Agrowon Diwali Article: गावकुसातील तरुण ‘क्रिएटर्स’

SCROLL FOR NEXT