न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव 
मुख्य बातम्या

न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन

न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून, हरभरा पिकाचीदेखील बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत आहेत.  यंदा समाधानकारक पाऊस झाला. उशिरापर्यंत पाऊस लांबल्याने रब्बीची पेरणी उशिरा झाली. तसेच अवकाळी पावसाने खरिपाचे नुकसान झाले. ढगाळ वातावरण ढगाचे आच्छादन या सततच्या ढगाळ वातावरणाने मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.  पूर्ण वाढ झालेल्या अळ्या झाडाची पाने खाऊन पानाच्या फक्त शिरा शिल्लक ठेवतात, नंतर अळ्या कोवळ्यावर हल्ला करून केसावरील कोवळे केस व कणसे खातात. तसेच मक्‍याच्या वाढीचा भाग खाली येत नाही. त्यामुळे पिकाच्या पुनर्उत्पादन क्षमतेवर वीस टक्केपर्यंत घट येते. तसेच हरभरा पिकावर घाटे अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. यावर्षी गहू पिकाच्या कांडीमध्ये अळी पडल्याने गव्हाची ओंबी कोरडी पडत आहे. गहू पिकात घट होण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT