तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव Infestation of legume larvae on trumpets
तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव Infestation of legume larvae on trumpets 
मुख्य बातम्या

तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन

अकोला : तुरीच्या पिकावर सध्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्या वाढल्या आहेत. यंदा झालेल्या पावसामुळे पिकापासून चांगले उत्पादन येण्याची शक्यता आहे. मात्र हवामान ढगाळ तसेच रात्रीच्या तापमानात घट होत आहे. हे वातावरण तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी पोषक आहे. किडीपासून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची फवारणीसाठी लगबग सुरू झाली आहे. यंदा तुरीच्या पिकाचा वऱ्हाडात पेरा वाढलेला आहे. सोयाबीन तसेच इतर पिकांमध्ये आंतरपीक म्हणून जवळपास पावणे दोन लाख हेक्टरवर लागवड झालेली आहे. सध्या तुरीचे पीक फुलोरावस्थेतअधिक प्रमाणात आहे. या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी (हेलीकोव्हर्पा) अंडी घातल्याचे तसेच अळीची ही पहिली अवस्था असल्याचे कीटकशास्त्रज्ञ व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यातील हवामान हे अंशतः ढगाळ व रात्रीच्या वेळी तापमान २ ते ३ सेल्सिअसने घटण्याची शक्यता आहे. हे हवामान तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. त्यामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्या पासून नुकसान होण्याची शक्यता वाढलेली आहे. अळ्या कळ्या व फुले खाऊन नुकसान करीत आहेत. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरत आहेत. अंड्यातून निघालेली अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाणे अर्धवट कुरतडते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT