देशातून बांगलादेशात ८० हजार टन मका निर्यात 
मुख्य बातम्या

देशातून बांगलादेशात ८० हजार टन मका निर्यात

कोजेन्सिस वृत्तसेवा

मुंबई  ः आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे दर भारतातील दरापेक्षा जास्त असल्याने बांगलादेश मका निर्यातीसाठी भारताला पसंती दिली आहे. बांगलदेशाने २०१८ मध्ये ७० ते ८० हजार टन मका भारतातून आयात केला अाहे, असे व्यापार सूत्रांनी सांगितले.  भारतीय बाजारात यंदा मक्याचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजाराेक्षा कमी आहेत. पीककाढणीच्या काळात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आर्द्रता आणि दर्जा यावर परिणाम झाला. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या मक्याला चांगला दर मिळत असला तरी कमी दर्जाचा मका हा १००० रुपये प्रतिक्विंटलपासून बाजारत विकला जात आहे. त्यामुळे देशातील पोल्ट्री आणि पशुखाद्य उद्योगाची गरज भागविण्यासाठी बांगलादेशने भारतीय मक्याला पसंती दिली आहे. निर्यात मालापैकी एप्रिलमध्ये ३० हजार टन, तर मे महिन्यात ४० ते ५० हजार टन निर्यात केली आहे, असे गुलबर्गा येथील एका व्यापाऱ्याने सांगितले.  कोलकाता येथील एका व्यापाऱ्याने सांगितले, की निर्यातीसाठीच्या मका पिकाला सरासरी २०० डॉलर प्रति टन दर मिळत आहे. बांगलादेश दोन वर्षानंतर भारताकडून मका आयात करीत अाहे. व्यापारी माल मोठ्या प्रमाणात रेल्वे अाणि मालवाहू वाहनांद्वारे पाठवतात.

 आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त दर मका प्रामुख्याने तेथील पोल्ट्री व्यवसायात खाद्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात अाहे. मका पिकाला जागतिक बाजारपेठेत चांगला बाजारभाव अाहे. बांगलादेश अाघाडीवरील आयातदार असून तो यावर्षी भारताकडून मका आयात करीत अाहे, असे गुलबर्गा येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. भारतीय मक्याचे दर ब्राझिलच्या तुलनेत प्रतिटन १० ते १५ डॉलरने स्वस्त अाहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT