Increase in the planning of Jalgaon district
Increase in the planning of Jalgaon district 
मुख्य बातम्या

जळगावच्या नियोजन आराखड्यात वाढ

टीम अॅग्रोवन

जळगाव : जिल्ह्यातील वार्षिक योजनेसाठी २०२०-२१ मध्ये जिल्हा नियोजन मंडळामार्फत ४३६ कोटी ७७ लाख ५१ हजार रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. येत्या सोमवारी (ता. २०) त्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन मंडळाची बैठक होत असून, या बैठकीत आराखड्यावर चर्चा होऊन मंजुरी देण्यात येईल.

राज्यात सत्तांतरानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्‍त्या रखडल्या होत्या. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनांच्या मंजुरीसाठी होणारी जिल्हा नियोजन मंडळाची बैठकदेखील  लांबणीवर पडली होती. मागील आठवड्यातच पालकमंत्र्यांच्या नियुक्‍त्या जाहीर करण्यात आल्या.

जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी गुलाबराव पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर तातडीने जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेण्याचे आदेश गुलाबराव पाटील यांनी दिले. त्यानुसार जिल्हा नियोजन मंडळाची बैठक सोमवारी (ता. २०) दुपारी एकला नियोजन भवनात आयोजित करण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील. पाटील यांच्या अध्यक्षतेत ही पहिलीच बैठक होत आहे.

सन २०१९-२० या आर्थिक वर्षात डिसेंबरअखेर जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ७०.६२. टक्के, आदिवासी घटक कार्यक्रम ७१.७९ टक्के, आदिवासी घटक कार्यक्रम (ओटीएसपी) ४४.१३, अनुसूचित जाती उपयोजना ९९.४७ असा एकूण ७२.७९ टक्के खर्च झाला आहे. उर्वरित निधी दोन महिन्यांत खर्च करण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणांसमोर  आहे.

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा विकास आराखडा ४३६ कोटी ७७ लाख ५१ हजार रुपयांचा आहे. प्रशासकीय यंत्रणांनी ३०४ कोटींची अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. २० जानेवारीस होणाऱ्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी दिली जाईल.

राज्यस्तरीय बैठक ३१ जानेवारीला जिल्हा वार्षिक योजनांचे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी नाशिक विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ३१ जानेवारीस विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे होणार आहे. यात जळगाव जिल्ह्याची बैठक दुपारी १२ ते १ या वेळेत होणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT