मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाची लग्न सोहळ्यात जनजागृती 
मुख्य बातम्या

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाची लग्न सोहळ्यात जनजागृती

टीम अॅग्रोवन

अकोला  : सध्या लग्न सोहळ्यांची धामधूम सुरू आहे. त्यामध्ये जमणाऱ्या हजारोंच्या गर्दीचा लाभ मतदानविषयक जनजागृतीसाठी उठवला जात आहे. अकोला लोकसभा मतदारसंघासाठी येत्या १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्या वेळी मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी रुस्तमाबाद येथील विवाह सोहळ्यातील वऱ्हाड्यांकडून ‘मी मतदान करणारच’ असे अभिवचन घेण्यात आले.

बार्शीटाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद येथे दिव्या राऊत आणि अनिल दाते यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. त्यात आलेल्या पाहुण्यांमध्ये मतदानाप्रती जागरूकता व्हावी, यासाठी ‘स्विप’चे जिल्हा समन्वयक प्रकाश अंधारे, महिला आर्थिक विकास मंडळच्या व्यवस्थापक वर्षा खोब्रागडे यांनी मतदार साक्षरता अभियान राबविले. स्थानिक जय बजरंग शाळेच्या शिक्षिका पुष्पा गोल्डे आणि सावित्रीबाई फुले गाइड पथकाच्या सहकार्याने मतदानाबाबत वऱ्हाड्यांमध्ये जागृती केली.

स्विपततर्फे मतदानाचा अधिकार निर्भय वातावरणात राबविण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी गाइड पथकाच्या मदतीने महिला आणि पुरुषांकडून मतदान करण्याचे लेखी अभिवचन घेण्यात आले. दिव्या, अनिल यांच्यासह त्यांच्या वडिलांनीही मतदान करण्याविषयी लेखी अभिवचन दिले. 

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, नोडल अधिकारी मनोज लोणारकर यांच्या मार्गदर्शनात मतदारांमध्ये जागरूकता घडवून आणण्यासाठी विविध कल्पक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT