कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील 
मुख्य बातम्या

कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

टीम अॅग्रोवन

जळगाव : शासकीय कापूस खरेदीला गती देण्यासाठी प्रशासनाला खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याचे आदेश शासनासह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. परंतु, खरेदी केंद्रांची संख्या फक्त पारोळा तालुक्‍यातच वाढली आहे. इतरत्र ही संख्या वाढत नसल्याने कापूस खरेदीसंबंधी यंत्रणेवर ताण येत आहे. 

भडगाव येथेही केंद्र लॉकडाउनमुळे बंद होते. हे केंद्र सुरू झाले आहे. यावल येथे खरेदी केंद्र नाही. यामुळे जळगाव येथील केंद्रांवर खरेदीचा ताण येत आहे. त्यातच एका केंद्रात रोज फक्त २० वाहनांमधील कापसाची तोलाई केली जात आहे. यामुळे कापूस खरेदीची गती वाढत नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात पणन महासंघाची भडगाव, पारोळा, धरणगाव, अमळनेर व एरंडोल येथे खरेदी सुरू आहे. 

कापूस महामंडळातर्फे (सीसीआय) जळगाव, भुसावळ, जामनेर, पहूर (ता.जामनेर), शेंदूर्णी (ता.जामनेर), बोदवड, पाचोरा, चोपडा व रावेरात खरेदी केंद्र आहेत. यात प्रत्येक तालुक्‍यात किमान चार ते तीन कारखान्यांमध्ये कापसाची खरेदी सुरू होणे अपेक्षित आहे. परंतु, सध्या फक्त पणन महासंघाचे पारोळा व धरणगाव येथे दोन कारखाने खरेदीसाठी कार्यरत आहेत. तर, ‘सीसीआय’तर्फे जामनेर तालुक्‍यात तीन आणि जळगावात दोनच कारखाने खरेदीसाठी कार्यरत आहेत. 

यावल येथे खरेदी केंद्रच नसल्याने तेथील शेतकऱ्यांना रावेर, भुसावळ, जळगाव येथे कापूस विक्रीसाठी यावे लागत आहे. तर, धरणगाव येथील जळगाव तालुक्‍यालगतचे काही शेतकरी जळगाव येथे कापूस विक्रीसाठी येत आहेत. खरेदीची मर्यादा कायम आहे. रोज किमान २ हजार वाहनांमधील कापसाची तोलाई जिल्ह्यात ‘सीसीआय’ व पणन महासंघाच्या केंद्रांमध्ये होणे अपेक्षित आहे. परंतु रोज ७०० ते ८०० वाहनांमधील कापसाचीच तोलाई होत आहे. 

पावसाळा तोंडावर आहे. शेतकऱ्यांना निधीची गरज आहे. कापूस घरातच राहीला तर शेतकरी खरीप कसा उभा करतील? असा प्रश्‍न आहे. या स्थितीत पालकमंत्री पाटील यांनी २२ मे रोजी जिल्हाधिकारी व कापूस खरेदी यंत्रणांचे सर्व अधिकारी, जॉब वर्कर्स यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यात कापूस खरेदीसाठी कारखान्यांची किंवा केंद्रांची संख्या वाढविण्याची सूचना दिली होती. जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकाऱ्यांवर ही जबाबदारी आहे. परंतु, खरेदीसाठी कारखान्याची संख्या फक्त पारोळ्यातच वाढली. पावसाळा सुरू झाल्यानंतरही कापसाची खरेदी अशीच सुरू राहील, अशी स्थिती आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karvand Market : डोंगरची काळी मैना बाजारात दाखल

Sugarcane Harvester : ऊस तोडणीयंत्र कर्ज सुलभ करण्याच्या सूचना

Cotton value Addition : कापसाच्या मूल्यवर्धनातून नागपूरचे शेतकरी ‘स्मार्ट’

Betel Leaf : पानांची आवक घटली; दरात चांगलीच वाढ

Cotton Rate : प्रतीक्षा करूनही वाढेनात कापसाचे दर

SCROLL FOR NEXT