गोपालन करून शेतीचे आरोग्य वाढवा Increase the health of agriculture by raising cattle 
मुख्य बातम्या

गोपालन करून शेतीचे आरोग्य वाढवा

गोपालनाच्या माध्यमातून कंपोस्टखत , गोमूत्र आणि गोकृपा अमृताचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी वापर करून जमिनीचे आरोग्य वाढवावे, सोबतच आपली आर्थिक बाजू सुद्धा मजबूत करावी, असे आवाहन गोपालभाई सुतारीया यांनी केले.

टीम अॅग्रोवन

वाशीम (प्रतिनिधी) :  जमिनीचे आणि पिकांचे आरोग्य राखण्यासाठी गो-आधारित शेती पद्धतीचा अवलंब करा. गोपालनाच्या माध्यमातून कंपोस्टखत , गोमूत्र आणि गोकृपा अमृताचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी वापर करून जमिनीचे आरोग्य वाढवावे, सोबतच आपली आर्थिक बाजू सुद्धा मजबूत करावी, असे आवाहन अहमदाबाद येथील बन्सी गीर गोशाळेचे प्रमुख गोपालभाई सुतारीया यांनी केले.

 कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने गो आधारित शेती पद्धतीवर आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षणात ते बोलत होते.  या वेळी अध्यक्षस्थानी केव्हीकेचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे होते. कार्यक्रमाचे आयोजक केव्हीकेचे उद्यानविद्या तज्ञ्ज निवृत्ती पाटील यांची उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात डॉ. काळे यांनी जमिनीच्या आरोग्याचे महत्त्व व त्याचे विविध पिकांवर होणारे परिणाम या विषयी माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक  सुतारीया यांनी जमिनीच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले जिवाणू, सेंद्रिय कर्ब इत्यादीबद्दल सविस्तर माहिती दिली. सद्यःस्थितीत रासायनिक खताच्या व औषधाच्या वापरामुळे जिवाणू चक्र कसे विस्कळित होत आहे, या बद्दल शास्त्रीय माहिती दिली. शेती पद्धतीमध्ये भारतीय संस्कृती आणि देशी गायीचे महत्त्व आणि देशी गायीपासून फक्त दूधच नव्हे तर तिचे गोमूत्र आणि शेण किती अमूल्य आहे. या विषयी माहिती दिली. देशी गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून विकसित केलेले गो-कृपा अमृत या जिवाणू कल्चरमध्ये ७०पेक्षा अधिक जिवाणू आणि त्यांचे कार्य, सोबतच शेतकऱ्यांना होत असलेले फायदे या विषयी सुद्धा त्यांनी माहिती दिली.  महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत निवृत्ती पाटील यांनी आभार मानले. तांत्रिक सहकार्य कृष्णा बावसकर यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT