Import ban on milk, vegetable in Wardha district
Import ban on milk, vegetable in Wardha district 
मुख्य बातम्या

वर्धा जिल्ह्यात दूध, भाजीपाल्यावर आयात बंदी 

टीम अॅग्रोवन

वर्धा ः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ‘कोरोना’बाधीत आढळले. वर्धा जिल्ह्यात याचे लोण पसरू नये याकरिता खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी भाजीपाला, दूध, फळे तसेच इतर जीवनावश्‍यक वस्तू जिल्ह्याबाहेर पाठविण्यावर आणि आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ‘कोरोना’बाधीत आढळले आहेत. प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, त्याला सामान्यांचा मिळालेला प्रतिसाद यामुळे वर्धा जिल्ह्यात ‘कोरोना’चा शिरकाव झाला नाही. यापुढील काळात देखील ‘कोरोना’चा प्रसार जिल्ह्यात होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. 

त्याकरिता वर्धा जिल्ह्यात दूध, फळे, भाजीपाला इतर जिल्ह्यातून आणण्यास बंदी लावण्यात आली आहे. जिल्ह्याबाहेर देखील अशा वस्तू पाठविण्यावर प्रशासनाकडून बंदी लावण्यात आली आहे. मंगळवार (ता. १४) पर्यंत ही बंदी लागू राहील, असा निर्णय जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी घेतला आहे. 

भाजीपाला विक्रेते हे अनेक नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. त्यानंतर सोमवार (ता. ६) व मंगळवारी (ता. ७) भाजीबाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता बुधवार (ता. ८) ते मंगळवार (ता. १४) या कालावधीत बाहेर जिल्ह्यातून कोणत्याही वस्तूची आवक होणार नाही. 

नागपूर, यवतमाळ तसेच अमरावती या वर्धा लगतच्या जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधीत आढळले आहेत. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी वर्धा जिल्ह्यात दूध, फळे व भाजीपाला आणण्यास आणि येथून जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  - विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

SCROLL FOR NEXT