नगरमध्ये रब्बीची पेरणी सहा टक्क्यांवर Rabbi sowing in the town at six per cent
नगरमध्ये रब्बीची पेरणी सहा टक्क्यांवर Rabbi sowing in the town at six per cent 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी 

टीम अॅग्रोवन

 नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६ टक्के पेरणी झाली आहे. पाऊस चांगला झाला आहे. जमिनी चिभडल्याने ज्वारी पेरणीला विलंब होत आहे. पेरणी कालावधी निघून गेला, तर त्याजागी गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. कांद्याचे यंदा मोठे नुकसान झाले. त्यामुळे कांद्याची लागवड गेल्या वर्षीएवढी होऊ शकते किंवा त्यात घटही होऊ शकते, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.  जिल्ह्यात रब्बीत ७ लाख २६ हजार २९२ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक ज्वारीचे ४ लाख ७७ हजार ०१८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. ज्वारीची साधारण सप्टेंबरमध्येच पेरणीला सुरुवात होते. गेल्या वर्षी एन पेरणीच्या काळात परतीच्या पाऊस लागून राहिल्याने वापसा व्हायला महिनाभर उशीर झाला. त्यामुळे गेल्या वर्षी ज्वारीचे सुमारे दीड लाख हेक्टरवर क्षेत्र घटले. यंदाही पावसामुळे अशीच स्थिती आहे. आतापर्यंत ज्वारीची ४१ हजार हेक्टरवर पेरणी झाली. अजून पेरण्या सुरू असल्या तरी गेल्या वर्षीचे घटते क्षेत्र पाहून यंदा तीन लाख हेक्टरवर पेरणी गृहीत धरून नियोजन केले आहे. 

आतापर्यंत मक्याची ८१९ हेक्टर, हरभऱ्याची ७३१ हेक्टरवर पेरणी झाली. ज्वारीचे क्षेत्र घटले, तरी त्या जागी हरभरा, गव्हाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी गव्हाची ८५ हजार हेक्टरवर, तर हरभऱ्याची पेरणी एक लाख हेक्टरच्या पुढे झाली होती. यंदा हरभऱ्यासाठी १ लाख ५३ हजार ६२७, गव्हासाठी ५६ हजार ८६३ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.  कांदा क्षेत्रवाढीची शक्यता नाही  नगर जिल्ह्यात प्रामुख्याने कांदा पीक घेतले जाते. उन्हाळी कांदा अधिक प्रमाणात घेतला जातो. कांद्याची खरिपात २५ हजार, रब्बीत साधारण साठ हजार तर उन्हाळी कांद्याची ४० हजार हेक्टरवर लागवड होते. दोन वर्षांपूर्वी वर्षभरात दीड लाख हेक्टरच्या पुढे कांदा लागवड झाली होती. यंदा आतापर्यंत रब्बीत ३६ हजार हेक्टरवर लागवड झाली. मात्र दर आणि झालेले नुकसान पाहता कांद्याचे क्षेत्र फारसे वाढेल, अशी शक्यता नाही.  सरासरी क्षेत्र (हेक्टर)  ज्वारी...४७७०१८  गहू...५६८६३  मका...३६०५४  हरभरा...१५३६२७  करडई...६५१  तीळ...११७  जवस...१५०  सूर्यफूल...१५७ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT