मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा ः लोणीकर
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा ः लोणीकर 
मुख्य बातम्या

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा ः लोणीकर

टीम अॅग्रोवन

परभणी ः आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी तसेच मराठा समाजाच्या मागास विद्यार्थ्यांसाठी परभणी येथे वसतिगृहाची सुसज्ज व्यवस्था प्राधान्याने केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या इमारतीमध्ये सुरू केलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मंगळवारी (ता. २५) मंत्री लोणीकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, माजी आमदार विजय गव्हाणे, अभय चाटे, आंनद भरोसे उपस्थित होते.

श्री. लोणीकर, की राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. परभणी येथील वसतिगृहासाठी मिळालेल्या इमारती सर्वांत जास्त चांगली आहे. यामुळे मराठा समाजातील मागास विद्यार्थ्यांची चांगली सोय होणार आहे.

श्री. शिवशंकर यांनी शासनाच्या योजनेविषयी माहिती दिली. डॉ. ढवण म्हणाले, की वसतिगृहासाठी प्राधान्याने इमारती उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यापीठातील वातावरण चांगले असून, याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही विद्यापीठ सहकार्य करील. अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, कार्यकारी अभियंता पार्डीकर, उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे, तहसीलदार विद्याचरण कडवकर हे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

SCROLL FOR NEXT