संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

मनरेगांतर्गत फळबाग लागवड याेजनेस मुदतवाढ

टीम अॅग्रोवन

पुणे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण राेजगार याेजनेअंतर्गत फळबाग लागवड याेजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी २०१७-१८ करिता फळबाग लागवडीचा कालावधी १ जून २०१७ ते १५ फेब्रुवारी २०१८ करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी (ता. २२) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण याेजनेअंतर्गत २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षामध्ये १ लाख ११ हजार १११ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार २०१६-१७ या वर्षात १६ हजार ४५१ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे, तर उर्वरित ९५४ हजार ६६० हेक्टरवर २०१७-१८ या वर्षात फळबाग लागवड करणे अपेक्षित आहे.

यापैकी १५ नाेव्हेंबर २०२७ अखेर ११ हजार ७९० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. मात्र सध्या अनेक शेतकरी फळबाग लागवडीसाठी उत्सुक असून, तशी पूर्व तयारी व नियाेजनदेखील केलेले आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण राेजगार याेजनेअंतर्गत फळबाग लागवड याेजनेस मुदतवाढ मिळावी, अशी विनंती फलाेत्पादन संचालकांनी केली हाेती.

त्यानुसार या याेजनेला मुदतवाढ देण्यात आली असून, शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याचा स्राेत उपलब्ध अाहे, याची खात्री करण्याच्या सूचना राेजगार हमी याेजना विभागाने केल्या आहेत. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना फलाेत्पादन संचालकांना जारी कराव्यात, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT