Dada Bhuse
Dada Bhuse  
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांचा सन्मान हा कामाचाच भाग ः दादा भुसे

टीम अॅग्रोवन

अमरावती ः शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष हा कृषी विभागाच्या दैनंदिन कामाचाच भाग आहे. त्यामुळे अपुऱ्या कर्मचारी संख्येचा हवाला देत या जबाबदारीपासून कोणालाही दूर जाता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कृषिमंत्री दादा भुसे यांनी मांडली. अमरावती दौऱ्यावर असलेल्या दादा भुसे यांनी गुरुवारी (ता. ६) ‘ॲग्रोवन’शी संवाद साधताना ही माहिती दिली. विदर्भात कृषी विभागात रिक्‍त पदांची संख्या मोठी आहे. त्यातच शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष प्रत्येक तालुका, उपविभागीय कृषी अधिकारी स्तरावर स्थापन करून तेथे एका कर्मचाऱ्याच्या नियुक्‍तीचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भाने विचारणा केली असता दादा भुसे यांनी कृषी विभागाच्या कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना हे कार्यालय आपले वाटले पाहिजे. शेतकरी कार्यालयात गेल्यानंतर त्यांची अनेकदा हेळसांड होते, अशाच तक्रारी आणि अनुभव आहेत. त्यामुळे कार्यालयात गेल्यावर त्यांना पाणी विचारणे, त्यांच्या कामाची आस्थेवाईकपणे माहिती घेणे आणि ते काम कोणत्या अधिकाऱ्याकडे होईल हे शेतकरी मार्गदर्शन व सन्मान कक्षाच्या माध्यमातून प्रभावीपणे होणार आहे.  हा नियमित कामाचा भाग असणार असल्याने त्याचे ओझे कृषी अधिकाऱ्यांना का वाटावे ? असा प्रश्‍न केला. शेतकरी आत्महत्यांवर चिंतेची आणि दुर्दैवी बाब आहे. त्यावर संवाद हा प्रभावी उपाय ठरणार आहे. गावात संवाद हरविला असून कृषी विभागाच्या माध्यमातून संवादावर भर दिला जाईल.  कागदांसाठी त्रास नको योजनांच्या अंमलबजावणीसाठी ऑनलाइन प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर योजनांसाठी वारंवार दस्तऐवज मागून शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडण्याचे प्रकार थांबतील, असा विश्‍वास दादा भुसे यांनी व्यक्‍त केला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

SCROLL FOR NEXT